फोटो ओळ : वळसंग (ता. जत) येथील गायरान जमिनीत अवैधरित्या मुरूम उत्खनन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : वळसंग (ता. जत) येथील गायरान जमिनीत ट्रॅक्टर,
जेसीबी मशीनच्या साहाय्याने गेल्या काही दिवसांपासून अवैध मुरूम उत्खनन सुरू आहे. ३६ ब्रास मुरूम काढल्यामुळे १५ ते २० फुटांचे खड्डे पडले आहे.
शेड्याळ-वळसंग रस्त्यावरील गायरान जमिनीत मुरूम उत्खनन रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, जेसीबी मशीनच्या साहाय्याने सुरू होता. हा मुरूम काढण्यासाठी परवानगी घेतली नाही. मुरूम उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते. असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
लगतच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात फोन करून सांगितले आहे. असे सांगितल्यावर मुरूम गायरान शेजारील मोहन चव्हाण यांच्या शेतात ओतून ट्रॅक्टर, जेसीबी मशीन पळून नेण्यात आली. त्यानंतर शेतकरी सागर मोहन चव्हाण यांनी तलाठी विशाल उदगिरी, अप्पर तहसीलदार हणमंत मेत्री यांंच्याकडे लेखी तक्रार केेेेली आहे. तक्रारीत जेसीबी नंबर दिला आहे.
या तक्रारीनुसार तलाठी विशाल उदगेरी, पोलीस पाटील राजू कुंभार, ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे, रमेश भीमसेन माळी, लहू पाटील, सागर मोहन चव्हाण, यशवंत कोळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.