शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा गांजाशेती पुन्हा फोफावतेय ! जत : कायदे कडक, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:34 IST

संख : कर्नाटकात उपलब्ध असणारी बाजारपेठ, कमी कष्टात मिळणारा पैसा, यामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये गांजाचे पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

गजानन पाटील ।संख : कर्नाटकात उपलब्ध असणारी बाजारपेठ, कमी कष्टात मिळणारा पैसा, यामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये गांजाचे पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उमदी पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोरबगी येथे दोन लाख ९८ हजार, लमाणतांडा माणिकनाळ येथे १४ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा पकडला आहे. ही २००४ आणि २०१५ नंतरची ही सर्वांत मोठी कारवाई होती. त्यामुळे तालुक्यातील गांजाचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे.

सीमाभागातील अनेक गावांत ऊस, मका, बाजरी, तूर, ज्वारी या पिकाअंतर्गत गांजा पिकाची लागवड केली जात आहे. हे पीक सात ते आठ महिन्यांत येते. एका एकरामध्ये चारशे झाडांची लागवड केली जाते. एका झाडापासून १० ते १५ किलो गांजा मिळतो. एकरी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. झाडांची लावण करताना गोपनियता पाळली जाते.गांजा शेतीच्या चोहोबाजूला उसाची किंवा तुरीची झाडे लावतात. त्यामुळे सहजासहजी कोणाचाही ते लक्षात येत नाही. पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची पाने तोडून वाळत घातली जातात. कोणतीही प्रक्रिया न करताच गांजा तयार होतो व त्याची तस्करी होते. बाजारात योग्य भाव नसेल तर कडब्याच्या गंजीत गांजा लपवून ठेवतात. कर्नाटकातील विजापूर, धारवाड, गुलबर्गा, जमखंडी, सोलापूर, सांगली, पुणे, बारामती, आदी ठिकाणी गांजाचे पार्सल पाठविण्यात येते.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, जत, उमदी पोलिसांकडून अनेकवेळा धाडी टाकल्या आहेत. आरोपींना मुद्देमालासह पकडूनसुद्धा एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. गांजा पकडण्यासाठी महसूल खात्यातील सक्षम अधिकारी घेऊन धाडी टाकणे बंधनकारक असताना एकाही धाडसत्रात महसूल अधिकाºयाचा समावेश केला जात नाही. हा वादाचा मुद्दा ठरू श्कतो. साक्षीदार पंच म्हणून ठराविक व्यक्तीची निवड केली जाते. त्यामुळेच कारवाईची जरब कमी झाली नाही.छाप्यातून लाखोंचा माल जप्तमाजी पोलीसप्रमुख डॉ. रवींद्र शिसवे यांनी २००४ मध्ये केलेल्या करवाईत तिकोंडी येथे चार लाख २६ हजार, तर उमदीचे पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांनी गिरगाव येथे १४० किलो गांजा पकडला. पांडोझरी येथे १५० किलो १ लाख १५० रुपये किमतीचा, तर तिकोंडी येथे ८ किलो गांजा पकडला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश पवार व पोलीस निरीक्षक सतीश पळसदेवकर यांनी २००३ मध्ये दोन ट्रकसह ६६ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला होता. तर चंद्रकांत श्ंिदे यांनी तिकोंडीतून १७५ किलो गांजा पकडला होता. २०१५ मध्ये गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पाच्छापूर व दरीबडची येथे ४२ लाख ७० हजारांचा गांजा पकडला होता.पाच वर्षांनंतर मोठी कारवाई२०१२ मध्ये उमदी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शशिकांत गोडसे यांनी सोनलगी येथे गांजा पकडला होता. त्यानंतर गेली पाच वर्षे कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. नूतन पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मोरबगी येथे दोन लाख ९८ हजार, लमाणतांडा, माणिकनाळ येथे १४ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा पकडला. या महिन्यातील ही सर्वांत मोठी धाडसी कारवाई केली आहे.पीक नोंदी वादातपीकपाणी नोंदी घालण्याचे काम गावकामगार तलाठी करतो. पीक नोंदी कार्यालयात बसून न करता प्रत्यक्षात प्लॉटवर जाऊन करावी, असा नियम आहे; परंतु तसे केले जात नाही. त्यामुळे शेतात कोणत्या पिकांची लागवड केली आहे, हे समजत नाही.