शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

इलियास नायकवडी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:25 IST

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन ...

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते.आष्टा (ता. वाळवा) येथे १५ जुलै १९३६ रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या इलियास नायकवडी यांना पाच भाऊ, दोन बहिणी आहेत. वडिलांचा शेती हाच व्यवसाय होता. प्रतिकूल परिस्थितीत आष्टा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर कामेरी (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून व पुढे सांगली जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात आटपाडी, कवठेमहांकाळ पंचायत समितीत उर्दू भाग शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेत नोकरी करीत असताना राजकारणाकडे अधिक कल असल्याने राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन वाळव्याचे आमदार विश्वास पाटील यांच्या माध्यमातून राजारामबापू पाटील यांचे ते जवळचे व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले.प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असताना पुरोगामी शिक्षक समिती ही शिक्षक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना केली. धडाडीचा कार्यकर्ता, बुद्धिचातुर्य व वक्तृत्व कलेमुळे, राजारामबापूंचे विश्वासू म्हणून त्यांनी राजकारणात स्थान मिळविले. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मिरज विधानसभेची निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्याविरोधात लढविली. त्या काळात वसंतदादा हे काँग्रेसचे सर्वेसर्वा असताना, दिग्गज प्रस्थापितांविरोधात नवखे उमेदवार असतानाही त्यांनी जोरदार संघर्ष केला. निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्या काळात त्यांच्या जबरदस्त भाषणशैलीचा जनमानसावर प्रभाव पडला. माजी आमदार विठ्ठलअण्णा पाटील त्यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. मिरजेत त्यांनी जनता सहकारी कुक्कुटपालन संस्थेची स्थापना केली.राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते असल्याने मिरज परिसरात माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार व्यंकाप्पा पत्की, माजी आमदार शरद पाटील, नानासाहेब सगरे, अण्णासाहेब डांगे, अजितराव घोरपडे, बापूसाहेब पुजारी असे अनेक सहकारी त्यांना मिळाले. मिरजेतील आझाद शिक्षण संस्थेचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अरबी उर्दू मराठी शाळा या शैक्षणिक संस्था जनाब यांनी चालविल्या. आपल्या बुद्धिचातुर्याने अनेक दिग्गजांना नामोहरम करत राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. तत्कालीन नगरपालिका व महापालिकेत त्यांनी सातत्याने प्रस्थापितांना हादरे दिले. मिरज नगरपालिकेत सून वहिदा नायकवडी व पुत्र इद्रिस नायकवडी यांना नगराध्यक्ष व महापालिकेत त्यांच्या कुटुंबातील एकाचवेळी तीन-तीन नगरसेवक निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. पुढे पुत्र इद्रिस नायकवडी यांना महापौर पदावर विराजमान करण्याचा यशस्वी प्रयोगही त्यांनी केला.जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत राजकारणात आपले स्थान कायम करणाऱ्या इलियास नायकवडी यांचा प्रवाहाविरुद्ध जाण्याचा स्थायीभाव होता. राजारामबापूंनी त्यांची औरंगाबाद विभागीय निवड मंडळावर सदस्य म्हणून निवड केली होती. मिरज नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. जयंत पाटील, विलासराव शिंदे, आर. आर. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राजकीय प्रवास केला. एखाद्या विषयाच्या समर्थनार्थ व विरोधात दोन्ही बाजू मांडण्याची त्यांची क्षमता प्रचंड होती. उदाहरण व कथा सांगून एखादी गोष्ट पटवून देण्याची त्यांची शैली होती. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक असलेले इलियास नायकवडी पंचतंत्र, इसापनीती, बोधकथा यांचा भाषणात समर्पक उपयोग करून उद्बोधन करीत असत. मेंदूच्या आजारामुळे गेले दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांचे निधन झाले.