इस्लामपूर : तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने सांगली-इस्लामपूूर या रोडलगत लाखो रुपये खर्च करून कृषी-विजय उद्यान उभे केले आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुतळे, बाग, कारंजे यांची दुरवस्था होत चालली आहे. उरुण इस्लामपूर शहरात उरुण हा भागात शेती करणारे शेतकरी जास्त प्रमाणात आहेत. याच भागातील नगरसेवकांचे वर्चस्व पालिकेवर आहे. विजयभाऊ पाटील यांनी अथक प्रयत्नांनी सांगली-इस्लामपूर रोडलगत कृषी-विजय उद्यान उभे आहे. या उद्यानात शेतकरी, सैनिक, शेतीला उपयोगी पडणाऱ्या अवजारे, बैलगाडी, गाय, वासरू, श्वान आदी पुतळे उभा केले आहेत. हे ठिकाण पर्यटनसारखे बनविले होते. परंतु पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुतळ्यांचा रंग उडाला आहे, तर काही पुतळ्यांना भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी झाडे वाळत चालली आहेत. याकडे योग्य वेळेत लक्ष नाही दिले, तर खर्च केलेले लाखो रुपये वाया जातील.
चौकट
याठिकाणी पालिकेकडून एकच महिला कर्मचारी आहे. येथे असलेल्या पाण्याच्या नळाला २४ तास पाणी येत होते. आता एक तासभर पाणी येते. त्यामुळे या बगीच्याला पाणीपुरवठा कमी पडत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामपूर हायस्कूलच्या भिंतीलगत तयार केलेल्या फूटपाथ लॉनची दुरवस्था झाली असून, भविष्यात ही विकासकामे नष्ट होतील.
फोेटो ०४१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
सांगली-इस्लामपूर रोडलगत कृषी विजय उद्यानामधील पुतळ्यांचा रंग उडाला आहे.