शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तासगावातील झोपडपट्टी पुनर्वसनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 16, 2015 00:52 IST

झोपडपट्टीमुक्त तासगावची अपेक्षा : घरकुलाची समस्या प्रलंबित

दत्ता पाटील --तासगाव शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देण्यासाठी नगरपालिकेने इंदिरानगर येथे घरकुलाची उभारणी केली. मात्र घरकुलाची समस्या कायम आहे. तसेच अजूनही अडीचशेच्या वर कुटुंबे तासगाव शहरात झोपडपट्टीत वास्तव्य करीत आहेत. झोपडपट्टीधारकांचे रखडलेले पुनर्वसन केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित होत असून झोपडपट्टीमुक्त तासगावची अपेक्षा व्यक्त होत आहे.तासगाव शहरातील झोपडपट्टीधारकांचा सहा वर्षापूर्वी सर्व्हे झाला होता. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्णय झाला होता. केंद्र शासनाच्या योजनेतून तब्बल पाच कोटी रुपये खर्चून इंदिरानगर परिसरात ३९३ घरकुले उभारण्यात आली. या घरकुलांचा लाभ देण्यासाठी झोपडपट्टीधारकांची नावे नगरपालिकेकडून निश्चित करण्यात आली होती. मात्र अद्यापही संबंधित लाभार्थ्यांना या घरकुलांचे अधिकृत वाटप करण्यात आलेले नाही. तसेच बहुतांश लोक बेकायदा घरकुलात राहत आहेत. पालिकेतील कारभाऱ्यांच्या उदासीनतेमुळे झोपडपट्टीचा प्रश्न निकालात निघालेला नाही. घरकुलात झोपडपट्टीधारकांचे पुनवर्सन झाले तरीही शहरात आणखी सुमारे अडीचशे झोपडपट्टीधारक आहेत. चिंचणी नाका, पुणदी रोड, साठेनगर, कांबळेवाडीसह शहरात अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे. या झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नेतृत्व बदललेले पालिकेचे कारभारी काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत असून, झोपडपट्टी मुक्तीसाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.घरकुलांच्या सुधारणेचे काय?मंजूर झालेल्या झोपडपट्टीधारकांना घरकुलाचे वाटप करण्याचा ठराव अनेकदा पालिकेच्या सभेत झाला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. घरांचे वाटप होण्यापूर्वीच या घरकुलांची दुरवस्था झालेली आहे. या घरकुलांची सुधारणा पालिका करुन देणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.