शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या निवासस्थानाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 16, 2014 00:12 IST

कडेगाव ग्रामीण रूग्णालय : रूग्णांची संख्या जास्त असताना मूलभूत सुविधांची वानवा

शाळगाव : कडेगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना निवासस्थान नसल्याने डॉक्टरांबरोबर रुग्णांचीही गैरसोय होत आहे. कडेगाव येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे. परंतु हे रुग्णालय बांधत असताना डॉक्टरांची किंवा कर्मचारी वर्गासाठी राहण्याच्यादृष्टीने त्यांना क्वार्टर बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांबरोबर रुग्णांचीही गैरसोय होत आहे.कडेगाव ग्रामीण रुग्णालयात एकूण १४ कर्मचारी काम करतात. त्यामध्ये तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पूर्वी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होती. ती इमारत पाडून ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. याकरिता एकूण सुमारे २ एकर ८८ आर जागा दवाखान्यासाठी घेण्यात आली आहे. याठिकाणी एकूण तीन वॉर्ड आहेत. ग्रामीण रुग्णालय बांधत असताना जागा असूनदेखील कर्मचारी वर्गासाठी स्वतंत्र क्वार्टर बांधण्यात आले नाही. त्यामुळे डॉक्टरांसह कर्मचारी वर्ग तीन शिफ्टमध्ये दवाखान्यात काम करतात. दवाखान्यात अत्याधुनिक पध्दतीच्या रुग्णवाहिका आहेत. सध्या दवाखान्यात सुमारे ३० गुंठे मोकळी जागा आहे. या ठिकाणी कर्मचारी क्वार्टर बांधावे, असे कर्मचाऱ्यांची मागणी आहे. कर्मचारी वर्गासाठी पोलीस खात्याची जागा खोल्या घेण्याचा निर्णय झाला होता. तशा प्रकारचा प्रस्ताव आरोग्य खात्याकडून देण्यात आला होता. त्यावेळी तो प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी जाहीर केले होते. परंतु त्याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने प्रश्न प्रलंबित आहे. आरोग्याधिकारी एच. एम. मदने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, सध्या राहण्याची गैरसोय आहे. त्यामुळे रात्री येणऱ्या रूग्णांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)