शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरला लाभलेला ‘स्वच्छतादूत’ दुर्लक्षित : अभियानापुरतीच जागृती झाल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:59 IST

स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत

ठळक मुद्देस्वच्छता अभियानातील विजेत्या शहरातच अस्वच्छतेचे साम्राज्य

अशोक पाटील ।इस्लामपूर : स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे कोणत्याही अपेक्षेशिवाय इस्लामपूर शहाराची स्वच्छता करणारा ‘स्वच्छतादूत’ मात्र सर्वांकडूनच दुर्लक्षित राहिला आहे.केवळ अभियानाची घोषणा झाल्यावरच स्वच्छतेबाबत जागरुकता दाखविणाºया इस्लामपूर पालिकेने स्वच्छ भारत अभियानात हिरीरीने भाग घेतला. शहरातील सर्वच घटकांनी मदत केली. यामुळे पालिकेला राज्यात आठवा क्रमांक मिळाला. परंतु अभियान संपले आणि पुन्हा शहरात कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. शहरातील मारुती मंदिर व गणेश मंदिरालगत कचºयाची दुर्गंधी आहे. रविवारी संकष्टीदिवशी या दुर्गंधीतूनच भाविकांना दर्शनासाठी यावे लागत होते. स्वच्छतेचा ठेका बगलबच्चांना देण्यात आला आहे. त्यामुळेच स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.एकीकडे पालिकेच्या स्वच्छता विभागाची अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र परराज्यातून शहरात आलेला एक अनामिक मात्र दररोज सकाळी ६ ते ८ या दोन तासात कोणत्याही अपेक्षेशिवाय झरी नाका ते गांधी चौकातील सर्व रस्ते स्वच्छ करतो. तो कन्नडमध्ये बोलतो. मात्र आपले नाव तो ‘महात्मा गांधींचा वारस’ असे सांगतो.हातात खराटा आणि स्वच्छता, एवढाच त्याचा नित्यक्रम. कपडे मळकटलेले आहेत. जो शहराची स्वच्छता करण्यासाठी आघाडीवर आहे. तो सगळ्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे. सामाजिक संघटनांनी त्याचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.स्वच्छतागृह कुलूपबंदस्वच्छ भारत अभियानाच्या काळात इस्लामपूर पालिकेने वाळवा बझारसमोर तातडीने दोन दिवसात उभे केलेले महिलांसाठीचे स्वच्छतागृह आता कुलूपबंद आहे. याचा वापर इतर कारणांसाठीच होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली