शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा तर पालकांनो, टाईम द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

सांगली : सर्वव्यापी बनलेल्या मोबाईलने आता मुलांचे बालपणही कब्जात घेतले आहे. आजवर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या पालकांना ...

सांगली : सर्वव्यापी बनलेल्या मोबाईलने आता मुलांचे बालपणही कब्जात घेतले आहे. आजवर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या पालकांना लॉकडाऊनच्या काळात स्वत:हून मुलांच्या हाती मोबाईल देणे भाग पाडले. मोबाईलने घरकोंबडी झालेली मुले मैदानी खेळांपासून दुरावत असल्याचे अत्यंत चिंताजनक चित्र घरोघरी दिसू लागले आहे.

विविध शाळांतील पालक मेळावे, शिबिरे यातील चर्चेमध्ये मुले आणि मोबाईल ही सार्वत्रिक चिंतेची बाब बनल्याचे पुढे येत आहे. सांगली-मिरजेसारख्या ग्रामीण शहरांतील सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोबाईल बंदी केली होती, त्यांनाही लॉकडाऊन काळात बंदी उठवावी लागली. सांगलीत गर्दीने नेहमी गजबजणाऱ्या शिवाजी क्रीडांगणावर सध्या फक्त रविवारीच मुले दिसतात, तीदेखील एखाद्या शिबिराच्या निमित्तानेच. एरवी मोबाईलच्या स्क्रीनवर तासनतास डोळे रोखून बसलेली मुले घरोघरी दिसू लागली आहेत. लहानग्या वयातच डोळ्यांचे डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञांचे रुग्ण ठरत आहेत. आमची मुले मोबाईलमध्ये आमच्यापेक्षा पुढे आहेत हे कौतुकाने सांगणारे पालक आता शिक्षकांना मोबाईलचे व्यसन सोडविण्यासाठी उपाय विचारताना दिसतात. क्रीडांगणावर खो-खो खेळण्याऐवजी मोबाईलवर तासनतास फायरिंगचा गेम खेळणारी मुले चिडचिडी आणि हिंसक बनत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मोबाईल खरेदी करतानाही पालकांपेक्षा मुलांनी ठरविलेल्या ब्रँडला अधिक पसंती मिळत आहे. कोणत्या मोबाईलमध्ये चांगली ॲप्स आहेत, गेमसाठी कोणत्या मोबाईलची बॅटरी अधिक चांगली याची गणिते मुलांनाच अधिक कळत आहेत. कर लो दुनिया मुठ्ठी मे म्हणताना मोबाईलने मुलांनाच मुठीत गच्च पकडले आहे.

चौकट

शाळेतून घरी परतताच मोबाईलमध्ये गुरफटलेली मुले मध्यरात्र झाली तरी त्यातच डोळे लावून बसतात. हातात मोबाईल असल्याशिवाय जेवायलाच बसत नाहीत असे एका महिलेने सांगितले. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवणाची सवय अति घातक आहे. २४ तास मोबाईलच्या सवयीला पालकांनीही आवर न घातल्याने नैसर्गिक बालपण हरवत चालले आहे. निद्रानाशासह अनेक आजारांचा विळखा मोबाईल घालू लागला आहे. काही पालक व उच्चभ्रू शाळा मुलांच्या हाती तथाकथित गरजेच्या नावाखाली मोबाईल देतात, नंतर तो काढून घेणे अजिबात शक्य होत नाही.

चौकट

विटीदांडू गायब

शहरी भागात मुलांचे मैदानी खेळ संपुष्टात येत आहेत. पारंपरिक खेळ कधीच हरवलेत, शिवाय क्रिकेट, फूटबॉल सारख्या सांघिक खेळात सुद्धा मोजकीच मुले मैदानावर दिसत आहेत. तुलनेने ग्रामीण भागात स्थिती नियंत्रणात आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने घरोघरी स्मार्टफोन नसणे किंवा संपूर्ण कुटुंबात एखादाच स्मार्टफोन असणे ही बाब मुलांना सक्तीने मैदानावर पाठविणारी ठरली आहे. मोडक्या तोडक्या सायकलीशी झोंबाझोंबी करणारी, टायरचे चाक करुन घामाघूम होईपर्यंत धावणारी, भर उन्हात गलोरी खेळणारी मुले मोबाईलने गायबच केली आहेत.

चैाकट

कोरोनाने दिला मोबाईलचा रोग

कोरोनाने अवघ्या जगाला कवटाळले आणि त्याचवेळी घराघरातील मुले मोबाईलच्या पाशात अडकली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ऑनलाईन शिक्षणही सुरु नव्हते. महिनो न महिने घरात बसलेले पालक टीव्हीत गुंतले तर मुलांनी मोबाईल जवळ केला. या काळात मोबाईल गेम डाऊनलोड करणे आणि ऑनलाईन गेमिंग करणे याचे प्रमाण सरासरीपेक्षा दहा ते वीस पटींनी वाढल्याचे निरीक्षण आहे.

८० टक्के इनडोअर गेम्स, २० टक्के आऊटडोअर गेम्स

कोट

मोबाईल म्हणजे मुलांचा दुसरा पालकच ठरला आहे. मोबाईल दिला नाही तर मुले हिंसक बनत असल्याचा अनुभव अनेक पालक सांगताना दिसतात. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांसाठी मोबाईल अत्यावश्यक बनला, पण त्याचे दुष्परिणामही तितक्याच गंभीरपणे जाणवत आहेत.

- अर्चना मुळे, समुपदेशक.

कोट

मुलासाठी स्वतंत्र स्मार्टफोन घ्यावा लागला. शाळेत जाताना मोबाईल देत नाही, पण परतल्यानंतर झोपेपर्यंत मोबाईल शिवाय त्याला चालत नाही. मोबाईल दिला नाही तर चिडचिडा बनतो. गेल्या अनेक दिवसांत क्रिकेटशिवाय अन्य खेळ त्याने खेळलेले नाहीत.

- विलास गावडे, ग्रामीण पालक