शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

हिम्मत असेल तर वादविवादास सामोरे या !

By admin | Updated: November 15, 2016 00:34 IST

उदयनराजेंचे ‘नविआ’ला आव्हान : सातारकरांच्या साक्षीने शाहू कलामंदिरात वादास तयार

दत्ता पाटील -- तासगाव --तासगाव नगरपालिका निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. शनिवारचा मुहूर्त साधून गणेशाच्या साक्षीने भाजप आणि राष्ट्रवादीने प्र्रचाराचा श्रीगणेशा केला. आरोपांच्या ठिणगीने एकहाती वर्चस्वाची खात्री देत, दोन्ही पक्षांकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. काँग्रेसकडूनही लवकर सुरुवात होईल. एकंदरीत प्रचाराच्या सुरुवातीवरुन तासगावचे राजकारण विकासाच्या मुद्द्यावरच फिरणार असल्याचे चित्र आहे.तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र पॅनेल उभा केले आहे. शेकाप, शिवसेनेसह अपक्षांनीही आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तासगावची निवडणूक यावेळी बहुरंगी होत असल्याने निकालाचे अचुक भाकित व्यक्त करणे अशक्य झाले आहे, मात्र सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून पालिकेवर आपलेच एकहाती वर्चस्व राहील, असा डांगोरा पिटण्यास सुरुवात झाली आहे. लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून शनिवारी सकाळीच खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेचा दाखला देत, पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून केलेल्या विकासकामांचा डांगोरा पिटत भाजपकडून सत्ता काबीज करण्याचा अजेंडा निश्चित केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादीनेही शनिवारी सायंकाळी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रचाराचा श्रीगणेशा केला. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील आणि त्यांची कन्या स्मिता पाटील या माय-लेकींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून आबांच्या पश्चात होत असलेल्या निवडणुकीला भावनिक किनार देत, भाजपच्या मनमानी कारभारावर टीकेची झोड उठवून सत्ता हस्तगत करण्याचा अजेंडा राष्ट्रवादीकडून निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आघाडीवर असणाऱ्या कॉँग्रेसकडून अद्याप जाहीरपणे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला नाही. मात्र लवकरच कॉँग्रेसकडूनही जाहीर प्रचाराची यंत्रणा राबवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. भाजपची सत्ता असताना, पालिकेतील बेलगाम कारभार, अवैद्य धंदे आणि खासदार संजयकाका पाटील यांना टार्गेट ठेवूनच काँग्रेसकडून प्रचाराची यंत्रणा राबवली जाणार असल्याची चर्चा आहे. सर्वच पक्षांकडून मतदारांना भुलविण्यासाठी विकासाच्या अजेंड्याचा भूलभुलय्या तयार करून पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी यंत्रणा लावली जात आहे. मात्र या विकासाच्या चेहऱ्याआड सर्वच पक्षांकडून आगामी पंधरा दिवसांत विरोधकांची कुंडली उकरुन काढून, कारभाराचा पंचनामाही केला जाणार असल्याचे चित्र प्रचार यंत्रणेवरून दिसून येत आहे. प्रचाराची सुरुवात आरोपांच्या फैरींनी झाली आहे. त्यामुळे प्रचाराचा शेवट कोणत्या पातळीवर जाईल, याचे कुतूहलही मतदारांच्या मनात आहे.काय असेल पक्षांचा अजेंडापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आठ महिन्यांच्या काळात भाजपकडून कोट्यवधींची विकास कामे करण्यात आली. केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे खासदार संजयकाका पाटील विकासकामे खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच यावेळीही भाजपला सत्ता द्यावी, याच अजेंड्यावर भाजपची प्रचार यंत्रणा असणार आहे.राष्ट्रवादी नेत्यांकडून भाजपच्या गुंडगिरी कारभारावर टीकामाजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकालात तासगावात कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. आबांच्या पश्चात पालिकेची पहिलीच निवडणूक होत आहे. भाजपच्या कारभाऱ्यांची ठेकेदारी, गुंडगिरी आणि अवैध धंद्यांवर निशाणा साधत भाजपला सत्तेत असताना अपेक्षित विकास साध्य करण्यात आलेले अपयश, याच अजेंड्यावर राष्ट्रवादीची प्रचार यंत्रणा असणार आहे.