शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

जत पूर्व भागात हुरडा पार्ट्यांचा जोर

By admin | Updated: February 9, 2015 01:16 IST

हंगाम बहरला : नेतेमंडळी, पै-पाहुण्यांंना निमंत्रणे

दरीबडची : अनुकूल हवामान, आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली. संपूर्ण शिवारभर पिके बहरली आहेत. सध्या पिके हुरड्यात आहेत. जत पूर्व भागातील शेतामध्ये तीन वर्षानंतर प्रथमच ज्वारी, मका पिकाचा हुरडा भाजण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. हुरडा खाण्यासाठी नेतेमंडळी, पै-पाहुणे, शासकीय नोकरवर्ग, मित्रमंडळींना आमंत्रणे दिली जात आहेत.पाहुणचार म्हणून ज्वारी, मका पिके हुरड्यात आली की रानामध्ये हुरडा भाजायच्या शेकोट्या पेटविल्या जातात. हिरवीगार ज्वारी, मक्याचा हुरडा आहारातील सकस अन्न आहे. हुरडा भाजण्यासाठी रानामध्ये थोडा खड्डा काढून शेणाच्या गवऱ्या घालून पेटविले जाते. त्यात ज्वारीची कणसे भाजली जातात. तसेच मक्याचा हुरडा काटरे जळण, लहान लाकडाचे जळण पेटवून त्यावर कणसाचा पाला थोड्या प्रमाणात काढून भाजली जातात. पातेल्यात घालून कणसे शिजवलीही जातात.हुरड्याबरोबरच शेंगदाणे, चटणी, मीठ, खोबरे असल्याने त्याचा चविष्टपणा वाढतो. गावात येणारा शासकीय अधिकारी, पाहुणा, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, नेतेमंडळी यांना सायंकाळी शेतावर बोलावून सध्या हुरडा पार्टी करून त्यांचा पाहुणचार केला जात आहे. (वार्ताहर)यावर्षी पाऊस चांगला झाल्याने ज्वारी, मकापिके चांगली आली आहेत. तीन वर्षानंतर पिके आल्याने हुरडा खायला मिळत आहे. हुरडा खाण्यासाठी आम्ही इतरांना आमंत्रण देतो. रानात भाजल्याने हुरडा चविष्ट लागतो.- कामाण्णा पाटील, शेतकरी हुरडा खाण्याची प्रथा कमी, शेतकऱ्यांचा व्यापारी पिके घेण्याकडे कल, संकरित बी-बियाणे, शहराकडे कामासाठी वाढत जाणारे लोंढे यामुळे हुरडा खाण्याची प्रथा हळूहळू कमी होऊ लागली आहे. निसर्गाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे कुुटुंबाला पुरेल एवढेच उत्पादन शेतकरी घेऊ लागला आहे. व्यापारी पिके घेण्यासाठी कल वाढला आहे. संकरित बियाणांची लागवड केल्यामुळे पूर्वीसारखा चविष्ट हुरडा निघत नाही. यामुळेही हुरडा खाण्याची प्रथा कमी झाली आहे.