शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

आठ कोटींच्या संगणक खरेदीच्या कागदपत्रांची शोधाशोध

By admin | Updated: September 13, 2014 00:14 IST

जिल्हा बँक : खरेदीवर चौकशीत आक्षेप; चौकशी अंतिम टप्प्यात, आठ दिवसात अहवाल सादर होणार

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कलम ८३ (१) खालील चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र बँकेने २०००-२००१ मध्ये केलेल्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या संगणक खरेदीची कागदपत्रेच चौकशी अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही या कागदपत्रांची शोधाशोध सुरू केली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात चौकशीचा अहवाल कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांना सादर होणार असल्याचे समजते. जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर २००१ ते २०१२ या कालावधीतील कामकाजाचे विभागीय सहनिबंधक डी. ए. चौगुले यांनी चाचणी लेखापरीक्षण केले होते. या चाचणी लेखापरीक्षणात गंभीर बाबी आढळून आल्या होत्या. त्यात बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमावर झालेला खर्च, लेखी अथवा तोंडी परीक्षा न घेता केलेली नोकरभरती, पेठभाग, सावळज, आटपाडीसह सहा शाखांच्या इमारतीचे अंदाजपत्रकापेक्षा जादा दराने केलेले काम, वसंतदादा कारखान्यास बगॅस कर्जावरील बँक गॅरंटी परत करणे, जादा दराने सीसी टीव्ही कॅमेरे, सिक्युरिटी अलार्म सिस्टिम, जनरेटर खरेदी, एटीएम मशीन खरेदी, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना दिलेला अनावश्यक पगार, ओटीएसखाली आष्टा पश्चिम भाग विकास सोसायटीला दिलेली नियमबाह्य सूट, संचालक मंडळाचा अभ्यास दौरा आदी बाबींचा समावेश होता. या गंभीर आक्षेपांची चौकशी करण्यासाठी कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांनी मिरज उपनिबंधक एम. एल. माळी यांची नियुक्ती केली होती. माळी यांनी गेल्या वर्षभरापासून चौकशीचे काम सुरू केले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौकशीत पंधरापैकी अकरा मुद्द्यांवर फारशी गंभीर बाब आढळून आली नसल्याचे समजते. तसेच आठ कोटींच्या संगणक खरेदीबाबत मात्र संशय वाढला आहे. २०००-२००१ या काळात तत्कालीन संचालक मंडळाने ही संगणक खरेदी केली होती. सुरुवातीला एका वृत्तपत्रात जाहिरात देऊन संगणक खरेदी केली. त्याआधारावरच २१७ शाखांसाठी आठ कोटींची संगणक खरेदी करण्यात आली. त्यासाठी स्वतंत्ररित्या जाहिरात देऊन दरपत्रके मागविण्यात आली नव्हती. याबाबतची कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्यांनी बँकेकडून मागविली आहेत. या कागदपत्रांचा बँकेच्या प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)