शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात राबताहेत शेकडो परप्रांतीय बालकामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:54 IST

दारिद्र्य तसेच भटकंतीमुळे शाळेकडे पाठ फिरविलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी विट्यात आश्रय घेतला आहे. आई-वडिलांनी घेतलेली पैशाची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार मालकांकडे राबत आहेत. शहरातील चायनीज पदार्थ, पाणीपुरीचे गाडे, बेकरी, चहा टपरी, बांधकाम, तसेच भंगार व्यवसायासह अन्य ठिकाणी त्यांचा सर्रास वापर होत आहे.

ठळक मुद्देविट्यात राबताहेत शेकडो परप्रांतीय बालकामगार दारिद्र्य तसेच भटकंतीमुळे शाळेकडे पाठ

दिलीप मोहिते विटा : दारिद्र्य तसेच भटकंतीमुळे शाळेकडे पाठ फिरविलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी विट्यात आश्रय घेतला आहे. आई-वडिलांनी घेतलेली पैशाची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार मालकांकडे राबत आहेत. शहरातील चायनीज पदार्थ, पाणीपुरीचे गाडे, बेकरी, चहा टपरी, बांधकाम, तसेच भंगार व्यवसायासह अन्य ठिकाणी त्यांचा सर्रास वापर होत आहे.विटा शहरात भंगार व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार, बेकरी उत्पादनात राजस्थान, गुजराती, उडपी, तसेच सुवर्णालंकार व्यवसायात बंगाली, तर बांधकाम व्यवसायात कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक बालकामगार राबत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारावर, तर काही बालकामगार केवळ दोनवेळचे जेवण व राहण्याची सोय होत असल्याने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी बालकामगार आपापल्या राज्यातून आणले आहेत.

या बालकामगारांना रात्रंदिवस कामात जुंपले जात असल्याचे समजते. या चिमुरड्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण होत आहे. परप्रांतातून आणताना त्यांच्या पालकांच्या हातावर वर्षाचे केवळ पाच-दहा हजार रुपये एकरकमी ठेवले जातात. त्यामुळे त्यांचे मालक कामगारांची खरेदी केल्यासारखी वागणूक या चिमुरड्यांना देत असतात.या बालकामगारांना बेकरी उत्पादन तयार करताना आगीच्या भट्टीसमोर, सुवर्णालंकार बनविताना अ‍ॅसिडच्या धुरात काम करावे लागते. भंगार जमा करताना लोखंडी साहित्याची वाहतूक करणे, चायनीज, पाणीपुरीचे हातगाडे ढकलत तासन् तास रस्त्यावर उभे राहणे यासह अन्य कामेही करावी लागतात. हॉटेल्स व कोल्ड्रींक्स व्यवसायातही अनेक बालकामगार राबत आहेत. सर्वाधिक बालकामगार बांधकाम व्यवसायात असल्याचे समजते. त्यांच्याकडून बांधकामाच्या मजल्यावर सिमेंट, वाळू, वीट, खडी अशा साहित्याची वाहतूक करवून घेतली जाते.

टॅग्स :Sangliसांगली