शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आंबे कसे ओळखाल? नैसर्गिक की कृत्रिम रसायनांनी पिकवलेले.. जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: May 6, 2024 18:24 IST

बाजारात हापूस, केसर, गावरानसह विविध प्रजातींचे आंबे दाखल

सांगली : यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासूनच फळांचा राजा आंबाबाजारात दाखल झाला. आंबा पाहून खवय्यांमध्ये खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली. पण, हे आंबे नैसर्गिकरीत्या पिकलेले होते का, हासुद्धा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ग्राहक नवीन आंबा बाजारात आला म्हणून कुठलीही चौकशी न करता खरेदी करत आहेत. मग नैसर्गिकरीत्या पिकलेला व रसायनांनी पिकवलेला आंबा ओळखायचा कसा, हेच जाणून घेण्याची गरज आहे.

कोणती फळे खाण्यास योग्यजैवरासायनिक प्रक्रिया झालेली आंब्यांसह इतर फळे खाण्यास योग्य असतात. यात कच्चे फळ ८ ते १० प्रक्रियेतून जात असते. यात रंग येणे, स्वाद निर्माण होणे, साखरेचे प्रमाण वाढणे, आम्लता कमी होणे, मऊपणा येणे अशी लक्षणे आंबे व इतर फळांमध्ये दिसल्यास ही फळे खाण्यायोग्य असतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे टाळावीत.

रसायनांनी पिकवलेले आंबे कसे ओळखाल?कॅल्शिअम कार्बाइडने पिकवलेली फळे घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही. फळांमध्ये योग्य ती पिकविण्याची प्रक्रिया न झाल्याने ती चवीला आंबट किंवा चवहीन असतात. पूर्णत: पिकलेले वाटणारे, पण तेवढेच हे आंबे घट्ट असतात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.

कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे घातकरसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे खाल्ल्यास आतड्यांचे गंभीर आजार, पोटातील अल्सर, डोकेदुखी, चक्कर, विस्मरण, झोप उडणे यांसारखे आजार व विकार होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

कसे ओळखाल आंबे?इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनांमुळे पिकणारी फळे थोडी मऊ असतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किंवा केशरी रंगाचा असतो.

बाजारातील आंब्याचे दर काय? (डझन)

  • हापूस ३०० ते ४०० रुपये
  • केसर १५० ते १८० रुपये
  • तोतापुरी ८० ते १०० रुपये
टॅग्स :SangliसांगलीMangoआंबाMarketबाजार