इस्लामपूर येथील महादेवनगरमध्ये वनश्री महिला संस्थेच्या वतीने माधुरी यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगवानराव साळुंखे, सुजित थोरात, रवींद्र वीरकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : महादेवनगर येथे महिला दिनाचे औचित्य साधून वनश्री महिला संस्था व महाडिक युवाशक्ती यांच्या वतीने ज्या महिलांनी सामाजिक, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले आहे, ज्या महिला आपले घर अतिशय उत्तमरित्या सांभाळतात, अशा गृहिणींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, उद्योजक सर्जेराव यादव, डॉ. सुरेंद्र गोडसे, उद्योजक मधुकर शेलार, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद थोरात, उदय देसाई, सामाजिक कार्यकर्ता अॅड. मेटकरी, जंगम गुरुजी, मनसेचे सतीश पवार, धीरज कबुरे, अभिजित देसाई, मयूर शेजाळे, अखिलेश शिंदे, स्वप्नील कुलकर्णी, महेश शेलार उपस्थित होते. महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी संयोजन केले. रवी वीरकर यांनी आभार मानले.