शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिवरे तिहेरी खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:54 IST

खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून प्रकरणी सुधीर सदाशिव घोरपडे (वय २४) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय २३) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनाविण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी खटला चालविला.

ठळक मुद्देहिवरे तिहेरी खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षाविशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चालविला खटला

सांगली : खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून प्रकरणी सुधीर सदाशिव घोरपडे (वय २४) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय २३) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनाविण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी खटला चालविला.खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, मतकुणकी येथील सुधीर घोरपडे याची बहीण विद्याराणी हिचा हिवरे येथील शिंदे कुटुंबात विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसानंतर विद्याराणी हिने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून तिचा सासरच्या लोकांकडून घातपात झाल्याची फिर्याद विटा पोलिसात देण्यात आली होती. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते. तेव्हापासून सुधीर घोरपडे शिंदे कुटुंबीयावर चिडून होता.२१ जून २०१५ रोजी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम हे दोघे शिंदे वस्तीवर आले. त्यावेळी घरातील पुरुष कोणीही नव्हते. घरात तीन महिला अंगणात बसल्या होत्या. सुधीर घोरपडे याने पाणी मागण्याचा बहाणा करून प्रभावती शिंदे यांना घरात पाठविले त्यावेळी या दोघांनी घरासमोर बसलेल्या निशिगंधा शिंदे व सुनीता पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघींच्या ओरडण्याच्या आवाजाने प्रभावती शिंदे बाहेर आल्या तेव्हा त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यांचाही त्यात मृत्यू झाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून वस्तीवरील लोक घटनास्थळाकडे धावले तोपर्यंत दोघेजण पळून गेले होते.त्यानंतर विटा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोमवारी युक्तीवाद झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला. त्यानुसार दोघांनाही मरेपर्यंत कारावासाची शिक्षा शिवाय दिड लाखांचा दंडही ठोठाविण्यात आला आहे. एकाचवेळी तीन महिलांच्या खूनाची घटना घडल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले होते.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखूनSangliसांगलीUjjwal Nikamउज्ज्वल निकम