शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीवरून हळदीचे सौदे बंद : सांगली मार्केट यार्डातील व्यापारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:49 IST

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जीएसटीच्या वादावरून बुधवारी हळदीचे सौदे ठप्प झाले आहेत. याबाबत जीएसटी अधिकारी, बाजार समिती, व्यापारी, आडते यांच्यात वारंवार बैठका होत आहेत. मात्र, त्यातून ठोस निर्णय होत नसल्याने प्रश्न प्रलंबित राहिला. केंद्रीय जीएसटी अधिकाºयांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मात्र, तोडग्याबाबत मतभिन्नता आहे.बुधवारी सकाळी हळद ...

ठळक मुद्दे अधिकाºयांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जीएसटीच्या वादावरून बुधवारी हळदीचे सौदे ठप्प झाले आहेत. याबाबत जीएसटी अधिकारी, बाजार समिती, व्यापारी, आडते यांच्यात वारंवार बैठका होत आहेत. मात्र, त्यातून ठोस निर्णय होत नसल्याने प्रश्न प्रलंबित राहिला. केंद्रीय जीएसटी अधिकाºयांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मात्र, तोडग्याबाबत मतभिन्नता आहे.

बुधवारी सकाळी हळद व्यापाºयांनी सौदे न काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजापुरी हळदीचे सौदे निघाले नाहीत. सभापती दिनकर पाटील, सचिव पी. एस. पाटील यांनी सौदे सुरू करण्याची विनंती केली. मात्र, व्यापाºयांनी जीएसटीसह बिले देण्यात येतील, असे सांगितले. मात्र, आडत्यांनी नकार दिला, त्यामुळे सौदे ठप्प राहिले.

महाराष्टासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू राज्यांतील प्रमुख हळद व सोयाबीन बाजारपेठांमध्ये अडत्यांकडून खरेदीदारांकडे बिल दिले असता, जीएसटी कपात केली जात नाही. याच धर्तीवर सांगली मार्केट यार्डातही बिले व पट्ट्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कायद्यांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमालाचा व्यवहार होत असेल त्या व्यवहारावर जीएसटीचा आकार नील या लिस्टमध्ये होतो. इतर बाजारपेठेप्रमाणेच बिल पट्ट्या नमुने करणे बाजारपेठेच्या हितासाठी आवश्यक असून, त्याचपध्दतीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला; परंतु जीएसटी कपात न करता बिले दिल्यास नोटिसा काढल्या जाण्याची शक्यता आहे. या कारणावरून व्यापाºयांत गोंधळ आहे.

बाजार समितीमध्ये जीएसटीचे राज्य उपायुक्त सुनिल कानुगडे, केंद्रीय जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त दिनेश नानद आणि सांगलीचे केंद्रीय जीएसटी अधिकारी राजेंद्र मेढेकर, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. सभापती दिनकर पाटील यांच्याशी रात्री ९ वाजता संपर्क साधला असता. त्यांनी बैठक चालूच असल्याचे सांगितले.व्यापाºयांच्या मनात भीती...माागील आठवड्यात हळदीच्या बिलपट्टीवर जीएसटी कपात न करता पट्टी देण्याबाबतचा निर्णय झाला आहे. मात्र, जीएसटीचा वाद अद्यापही संपलेला नाही. जीएसटी कपात न करता बिले दिल्यास नोटिसा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाºयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.