शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 13:03 IST

मिरज-कोल्हापूर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कापण्यात येणाऱ्या मोठ्या झाडांचे आपल्या शेतात स्वखर्चाने पुनर्रोपण करुन मिरजेतील डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी १५ झाडांना जीवदान दिले आहे. रस्त्यालगतच्या कापण्यात येणाऱ्यां आणखी काही झाडांचे पुनर्रोपण करण्याची डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांची तयारी आहे. हळिंगळे यांच्या या कार्याचे वृक्षप्रेमींकडून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देमहामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपणमिरजेतील डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी दिले १५ झाडांना जीवदान

मिरज : मिरज-कोल्हापूर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कापण्यात येणाऱ्या मोठ्या झाडांचे आपल्या शेतात स्वखर्चाने पुनर्रोपण करुन मिरजेतील डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी १५ झाडांना जीवदान दिले आहे. रस्त्यालगतच्या कापण्यात येणाऱ्यां आणखी काही झाडांचे पुनर्रोपण करण्याची डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांची तयारी आहे. हळिंगळे यांच्या या कार्याचे वृक्षप्रेमींकडून कौतुक होत आहे.मिरज-कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण सुरु असून यासाठी रस्त्यालगत असलेली अनेक झाडे कापण्यात येत आहेत. व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांचे मिरजेत कोल्हापूर रस्त्यावर फार्म हाऊस आहे. त्यांनी येथे विविध प्रकारची सहाशे झाडे लावली आहेत. झाडे जगविण्यासाठी व मोठी होण्यासाठी अनेक वर्षे परिश्रम घ्यावे लागतात.महामार्गालगतची १५ ते २५ वर्षे वयाची झाडे कापण्यात येत असल्याचे पाहून डॉ. हळिंगळे यांनी या झाडांचे पुनर्रोपण करण्याचे ठरविले. डॉ. हळिंगळे व त्यांच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या पथकाने फार्म हाऊसमध्ये नारळ, आवळा, कडीलिंब, चिकूच्या १५ ते २५ वर्षे जुन्या १५ मोठ्या झाडांचे रस्त्यालगतच्या फार्म हाऊसमध्ये पुनर्रोपण केले.जेसीबी, क्रेन व ट्रॉलीच्या साहाय्याने झाडाच्या बुंध्याजवळ जवळजवळ आठ चौरस फुटाचा खड्डा खणून झाडे बाहेर काढण्यात आली. नवीन ठिकाणी रोपण करण्यापूर्वी झाडाची मुळे, माती जमिनीला घासू नये, यासाठी पोती व साध्या कापडाने बांधली. नवीन जागेत सुमारे दहा चौरस फुटाचा खड्डा काढून झाडे लावण्यात आली.निर्मल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसह झाडांच्या पुनर्रोपणाची माहिती असलेले स्वरूप रायनाडे, विनायक कवडे, सागर जाधव, भैरव वालीकर, दीपक साळुंखे, आपासाहेब हुरले, कोळेकर यांच्या मदतीने पुनर्रोपण करण्यात आले. सुमारे अर्धा किलोमीटर परिसरातील झाडांचे फार्म हाऊसमध्ये पुनर्रोपण केले असून नव्या ठिकाणी या झाडांचे रोपण यशस्वी झाले आहे.