शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

उपमहापौर गटाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By admin | Updated: October 18, 2016 00:52 IST

महापालिका : स्थायी सभापती निवडीचा मार्ग मोकळा

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील सहा सदस्यांच्या निवडीविरोधात उपमहापौर गटातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी देवमाने, अल्लाऊद्दीन काझी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सोमवारी आठ सदस्यांचा ठराव करून सभापती निवड कार्यक्रमाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या २५ अथवा २६ रोजी सभापती निवड होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा दावा फेटाळला. महापालिकेच्यावतीने अ‍ॅड. वालावलकर यांनी बाजू मांडली, तर याचिकाकर्त्याच्या बाजूने अ‍ॅड. विजय किल्लेदार यांनी बाजू मांडली. स्थायी समितीच्या सदस्य निवडीचे पुराण गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी यापूर्वीच एक याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल लागताच महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेचा अजेंडा काढून दोन सदस्य निवडीचा विषय घेतला. हा वाद मिटण्याच्या मार्गावर असतानाच, उपमहापौर गटातील राष्ट्रवादीचे नगरसेवक अल्लाऊद्दीन काझी, शुभांगी देवमाने यांनी एक सप्टेंबरची महासभाच बेकायदेशीर असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांच्या निवडी नव्याने घ्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.महापालिकेचे वकील अ‍ॅड. वालावलकर यांनीही महापालिकेची बाजू मांडली. याचिकाकर्त्यानी राज्य सरकारकडे याबाबत तक्रार करायला हवी होती. तिथे दाद मिळाली नसती, तरच न्यायालयात दाद मागता आली असती. ते थेट न्यायालयात आले आहेत. याआधी स्थायीच्या सहा सदस्य निवडीचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे स्वाभिमानीचा बंद लिफाफा महासभेत उघडून दोन नावे जाहीर केल्याचे अ‍ॅड. वालावलकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने देवमाने व काझी यांचा दावाच रद्द ठरवला. (प्रतिनिधी)दिलीप पाटील यांचे नाव निश्चितसभापती पदासाठी सांगलीवाडीचे नगरसेवक दिलीप पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला आहे. दिलीप पाटील यांना एक वर्षासाठी सभापतीपद दिले जाणार आहे. मदनभाऊ पाटील यांनीही दिलीप पाटील यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. मिरजेचे अतहर नायकवडी व कुपवाडच्या निर्मला जगदाळे इच्छुक असले तरी, सध्या तरी पाटील यांचेच पारडे जड आहे.