शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुप’ची आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत

By admin | Updated: February 9, 2016 00:15 IST

आर्थिक पाठबळ : शासकीय मदतीपासून वंचित असणाऱ्यांना दिलासा

 संख : समाजात मीडियाचा दुरुपयोग होत असल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र कायम दुष्काळी जत येथील व्हॉटस्-अ‍ॅप गु्रपने सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबविला आहे. तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ३० हजाराची मदत केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठीदेखील करता येऊ शकतो, याचा प्रत्यय आणून देण्यात आला. पावसाअभावी तालुक्यामध्ये १९७२ पेक्षाही भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची अवस्था भीषण आहे. त्यामुळे तालुक्यातील गुड्डापूर येथील रमेश पुजारी व दरीबडची येथील शेतकरी श्रीमंत चौगुले यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आॅक्टोबर महिन्यामध्ये आत्महत्या केली. घरातील या कर्त्या व्यक्तीनेच आत्महत्या केल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते. अशा कुटुंबांना मदत करण्याकरिता ‘शासनाचे काम सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आजही मदत मिळालेली नाही. शासकीय नियमांच्या जंजाळात ही मदत अडकली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने जतमधील आ. विलासराव जगताप व्हॉटस्-अ‍ॅप गु्रपने गु्रपच्या सदस्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला या ग्रुमपमधील अनेक सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तीस हजार रुपये जमा केले. जगताप यांच्याहस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली. यावेळी बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम, माजी पं. स. सदस्य सोमाण्णा हाक्के, मारुती पवार, सरदार पाटील, अमोल कुलकर्णी, लखन होनमारे, संदीप काशीद, योगेश शिंदे, सुभाष कांबळे, अशोक स्वामी, शशिकांत कोडग, तानाजी कोडग, अजित मुळे, मनोहर चौगुले, दिगंबर निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वारसांना मदतीचा हातव्हॉटस्-अ‍ॅपच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम गुड्डापूर येथील रमेश पुजारी व दरीबडची येथील श्रीमंत चौगुले यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी पंधरा हजार रुपये देण्यात आली.