शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने सांगली जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुसळधार पावसाने सांगली शहर जलमय झाले आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी पहाटेपर्यंत कायम होता. त्यामुळे शहराच्या सखल भागासह गुंठेवारी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. रविवारीही सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी पडले.जिल्ह्यात सप्टेंबरअखेर शासकीय दप्तरी पावसाळा संपला असला तरी, आॅक्टोबरचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुसळधार पावसाने सांगली शहर जलमय झाले आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी पहाटेपर्यंत कायम होता. त्यामुळे शहराच्या सखल भागासह गुंठेवारी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. रविवारीही सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी पडले.जिल्ह्यात सप्टेंबरअखेर शासकीय दप्तरी पावसाळा संपला असला तरी, आॅक्टोबरचा पहिला पंधरवडासुद्धा पावसाने उघडीप दिलेली नाही. सलग पावसाच्या हजेरीने नागरिकांना हैराण केले आहे. शेतीच्या नुकसानीसह सणाच्या उत्साहावर पावसाचे पाणी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी रात्री मुसळधार पावसाने शहराला झोडपले.रविवारी पहाटेपर्यंत पावसाचा मुक्काम होता. त्यामुळे शहराला जलमय स्वरुप प्राप्त झाले होते. शहराच्या अनेक भागात तलाव साचले होते. क्रीडांगणे, सखल भाग, बाजारपेठा आणि गुंठेवारी अशा सर्वच भागांमध्ये साचलेल्या पाण्याचे अस्तित्व रविवारीही कायम होते.दिवाळी असल्याने सांगली शहरात प्रमुख बाजारपेठांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील नागरिक गर्दी करीत आहेत. शनिवारी प्रमुख बाजारपेठा ग्राहकांनी फुल्ल होत्या. त्याचदिवशी सायंकाळी पावसाने ग्राहक व विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रविवारीही बाजारात दिवसभर गर्दी होती. सायंकाळी पुन्हा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी कमी झाली.