चालू वर्षी वळीव पावसाने मे महिन्यात दमदार हजेरी लावली. परिणामी, खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली. पेरणीही वेळेत झाली.
खरीप पिकांची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला होता.
सोमवारी पावसाने पुन्हा एकदा दमदार स्वरूपात हजेरी लावली. सुमारे एक तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. मात्र, घाटमाथ्यावरील काही गावांत पावसाने हुलकावणी दिली.
खानापूर, मोही, शेडगेवाडी, पोसेवाडी अडसरवाडी, तामखडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.