शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

By अशोक डोंबाळे | Updated: September 21, 2024 21:57 IST

उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला.

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: मागील चार दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर शनिवारी सांगलीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील अनेक गावांत जोराच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सांगली शहरात मुसळधार पाऊस झाला. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे आठवडा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला.

जिल्ह्यात जुलै आणि ऑगष्टच्या सुरुवातीला मुसळधार बसरणारा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून गायब आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून उष्मा वाढला होता. ढगाळ वातावरणही राहिले, मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यात चांगला पाऊस झाला. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहा वाजल्यापासून जोराच्या पावसाला सुरुवात झाली.

शनिवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस सुरुच राहिला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते.चौकट

महिनाभर परतीचा पाऊसराज्यात २१ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल तो ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परतीचा पाऊस रब्बी हंगामास उपयुक्त ठरणार आहे. पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगली