शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँकप्रश्नी सुनावणीचे आदेश

By admin | Updated: January 7, 2015 23:23 IST

जिल्हा उपनिबंधकांची माहिती : स्थगितीवरील निर्णयापूर्वी म्हणणे मांडण्याची संधी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेपाठापोठ आता वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या सुनावणीचे आदेशही सहकार विभागाने दिले आहेत. त्यानुसार उद्या (बुधवारी) पहिली सुनावणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचे ११ जानेवारी २00८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले. याच लेखापरीक्षणाच्या आधारे ४ जुलै २00८ रोजी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 मधील कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश देण्यात आले. सुरुवातीला महेश कदम व नंतर अ‍ॅड. रैनाक यांनी चौकशी केली. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. नवे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ही स्थगिती उठविण्यात आल्याचे जाहीर केले होते. सुनावणी न घेता, तत्कालीन संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी न देता स्थगिती उठविण्याच्या प्रक्रियेमुळे अनेकांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे सहकार विभागाने सुनावणीच्या प्रक्र्रियेला प्राधान्य दिले. त्यानुसार राज्यातील अशा स्थगिती असलेल्या संस्थांच्या चौकशी प्रक्रियेत सुनावणीचे काम सुरू केले आहे. सांगलीतील दोन बँकांबाबत सहकार विभागाने सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचा समावेश आहे. वसंतदादा बँकेत ३१५ कोटींच्या ठेवी असून ३२0 कोटी रुपयांची कर्जे आहेत. यातील २९0 कोटींच्या कर्जांची थकबाकी असल्याची माहिती २00९ मध्ये देण्यात आली होती. बँकेच्या राज्यात ३६ शाखा आहेत. २६ जून २00८ रोजी रिझर्व्ह बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर ७ जानेवारी २00९ रोजी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच शहरातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी अडकल्या आहेत. या बँकेच्या कलम ८८ च्या स्थगितीबाबत निर्णय घेण्यापूर्वी आता सहकार विभागाने सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)जिल्हा बँकही टप्प्यातजिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील १५७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी कलम ८३ ची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर कलम ८८ नुसार चौकशी सुरू झाली होती. त्यावेळी माजी संचालकांनी सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली. तत्कालीन सहकारमंत्र्यांनी या चौकशीला स्थगिती दिली होती. आता याप्रकरणीही सुनावणी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.