शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या घोटाळ्यांवरील सुनावणी आता पुढील वर्षी, विभागीय आयुक्तांचा अहवाल सादर

By अविनाश कोळी | Updated: December 13, 2022 12:18 IST

महापालिकेतील वीज बिल घोटाळ्यासह तब्बल दहा प्रकरणातील अपहारांच्या चौकशी

सांगली : महापालिकेतील वीज बिल घोटाळ्यासह तब्बल दहा प्रकरणातील अपहारांच्या चौकशीप्रकरणी लोकायुक्तांसमोर मंगळवारी सुनावणी झाली. चौकशीचा अहवाल उशिराने प्राप्त झाल्याने आता या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी १५ फेब्रुवारी २०२३ ला ठेवण्यात आली आहे.येथील नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर तानाजी रुईकर, रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेच्या गैरकारभाराबाबत लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. महापालिकेच्या वीजबिलात ५ कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. वीज बिलांचे दहा वर्षाचे लेखापरीक्षण केल्यास हा घोटाळा १० ते १२ कोटींच्या घरात जाऊ शकतो.

२००१ ते २०१० या कालावधी महापालिकेच्या लेखा परीक्षणात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या आक्षेपाबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून वसुली करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ही बाब साखळकर यांनी लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती.शेतकरी बँकेतील ठेवी, एचसीएल प्रकल्पासह विविध प्रकल्पाबाबत केलेल्या १० प्रकरणांची लोकायुक्तांनी दखल घेतली होती. जवळपास १०० कोटींचा हा अपहार आहे. सर्व प्रकरणांची चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांना दिले होते त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी चौकशी पूर्ण करुन त्यांचा अहवाल लोकायुक्तांकडे सादर केला आहे.मंगळवारी मुंबईत लोकायुक्तांसमोर सुनावणी झाली. यावेळी हा अहवाल उशिरा प्राप्त झाल्याने अहवालाचे अवलोकन करून सुनावणी घेणे वेळेअभावी कठीण असल्याचे सांगत १५ फेब्रुवारी तारीख देण्यात आली आहे.

लोकायुक्तांनी पाहिला सारांशलोकायुक्त यांनी अहवालाचा सारांश पाहून तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीमध्ये बरेच तथ्य असल्याचे म्हणणे विभागीय आयुक्त यांच्या अहवालात असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली