लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप महिला मोर्चा वैद्यकीय आघाडीच्यावतीने महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात हिमोग्लोबिन व कॅल्शियमची कमतरता, ब्रेस्ट व गर्भाशयाचा कॅन्सर यावर मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षा डॉ. अपेक्षा महाबळेश्वरकर व सरचिटणीस डॉ. सीमा किनिंगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शबाना लांडगे यांनी कोरोना लसीकरणाबाबत माहिती दिली.
यावेळी डॉ. वैदेही लोमटे, डॉ. स्वाती कुलकर्णी, डॉ. नितल जैन, डॉ. प्राची कुलकर्णी, डॉ. प्रणोती भिसे, डॉ. मृणाल कुलकर्णी, डॉ. आरती पडसलगीकर आदींसह वैद्यकीय आघाडीच्या डॉक्टर, पदाधिकारी उपस्थित होत्या.