आष्टा : आष्टा
येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना व अण्णासाहेब डांगे मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे सोमवार, दि. ८ रोजी बाजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ९ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय कदम, उपाध्यक्ष डी. एस. कोळी व सचिव ए. आर. लतीफ यांनी दिली.
ए. आर. लतीफ म्हणाले, या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, त्वचा विकार, लकवा, दमा, दम लागणे, स्त्रियांचे विविध आजार, संधिवात, सांध्याचे आजार, मणक्याचे विकार, लठ्ठपणा, झोप न लागणे, आम्लपित्त, कान-नाक-घसा तपासणी, डोळे तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मुतखडा इत्यादी तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. शिबिरात मोफत ईसीजी तपासणी, रक्त, साखर तपासणी तसेच एचडी तपासणी करण्यात येणार आहे. बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्था, फायटर्स कला क्रीडा व व्यायाम मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था, क्रांतिवीर उमाजी नाईक सेवाभावी संस्था, सेवानिवृत्त शिक्षक संघटना, एमजीव्ही ग्रुप, आष्टा औद्योगिक विकास असोसिएशन, आजाद सेवाभावी संस्था, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभत आहे.