शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

पूर्ववैमनस्यातून हरोलीच्या सरपंचाचा निर्घृण खून

By admin | Updated: May 19, 2017 00:08 IST

पूर्ववैमनस्यातून हरोलीच्या सरपंचाचा निर्घृण खून

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : पूर्ववैमनस्यातून हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथील विद्यमान सरपंच व शिवसेनेचे नेते युवराज बाळासाहेब पाटील (वय ४५) यांचा बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी मानेवर, डोक्यात, पाठीवर वार करून निर्घृण खून केला. शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. या खुनाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत तीन संशयितांना अटक केली. मुख्य संशयित रमेश आप्पा खोत (४३), राजेंद्र विठोबा खोत (२१) व हणमंत निवृत्ती टोणे (२३, तिघेही रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) अश्ी त्यांची नावे आहेत. युवराज पाटील बुधवारी मध्यरात्री एक वाजता मोटारीने देशिंग येथून हरोलीतील त्यांच्या शेतातील घरी गेले होते. घराजवळ मोटार लावल्यानंतर अंधारात दबा धरून बसलेल्या रमेश खोतसह तिघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. मानेवर, डोक्यात, पाठीवर वार झाल्याने काही क्षणातच पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडून ठार झाले. त्यांची गाडी पाहून आई घराबाहेर आली, त्यावेळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. आईने नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, उपअधीक्षक नागनाथ वाकुडे, निरीक्षक सिराज इनामदार यांनी घटनास्थळी भेट दिली.युवराज पाटील यांच्या मोटारीवर सूर्यकांत शंकर यादव हा चालक आहे. यादव व मुख्य संशयित रमेश खोत याचा भाचा अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर यांच्यात गतवर्षी किरकोळ वादातून मारामारी झाली होती. याप्रकरणी यादव याने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार अमर आटपाडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्यांच्यातील वाद वाढतच गेला. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. यादव याने अमर आटपाडकर याचा खून करण्यासाठी थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील अर्जुन बाळकृष्ण आटपाडकर याला ‘सुपारी’ दिली होती, असा संशय अमरला होता. त्यामुळे अमरने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने ‘सुपारी’ घेणाऱ्या अर्जुन आटपाडकर याचा गतवर्षी कवठेमहांकाळच्या थबडेवाडी चौकात धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केला होता. याप्रकरणी अमर आटपाडकर व त्याच्या साथीदारांना अटक झाली होती. तेव्हापासून संशयित रमेश खोत व मृत युवराज पाटील यांच्यातील वैमनस्य वाढतच गेले. त्यांनी एकमेकांना संपविण्याचा विडा उचलला होता. यातूनच संशयितांनी बुधवारी मध्यरात्री पाटील यांचा पाळत ठेवून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.कवठेमहांकाळ बंदखुनाची घटना समजताच कवठेमहांकाळ शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच बंद ठेवले होते. शहरासह हरोली, देशिंग येथे तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरा युवराज पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.वादळी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्वयुवराज पाटील आक्रमक स्वभावाचे होते. बंधू शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्यासोबत त्यांनी तरुणांचे संघटन केले आहे. त्या जोरावर त्यांनी कवठेमहांकाळ परिसरात दरारा निर्माण केला असून, त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त बनले होते. २००८ मध्ये कवठेमहांकाळ येथे शाळेत झालेल्या रामा जाधव यांच्या खून प्रकरणात त्यांचे नाव होते. मात्र त्यातून ते निर्दोष सुटले होते. आताही संशयित रमेश खोत याच्यासोबत त्यांचा वाद होता. वर्षभरापूर्वी झालेल्या अर्जुन आटपाडकरच्या खुनापासून दोघांनी एकमेकांना संपवण्याचे ठरवले होते. मात्र त्यात पाटील यांचा खून झाला.