शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हरिपूरच्या संशोधकाने उभारली ‘इनोव्हेशन फॅक्टरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:57 IST

science Sangli- परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी सोडून सांगली येथील एका संशोधकाने हरिपूर (ता. मिरज) येथे संशोधनाचा कारखाना उभारून नवनव्या प्रयोगांना जन्म दिला. इलेक्ट्रिकल सायकल, इलेक्ट्रिकल व्हिलचेअर, मोल्डलेस कंपोझिट फायबर, सोलर पॉवरबेस इलेक्ट्रिक रिक्षा असे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत.

ठळक मुद्देहरिपूरच्या संशोधकाने उभारली ‘इनोव्हेशन फॅक्टरी’नवनवे प्रयोग : इलेक्ट्रिकल सायकल, व्हिलचेअरच्या प्रयोगाला यश

अविनाश कोळीसांगली : परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी सोडून सांगली येथील एका संशोधकाने हरिपूर (ता. मिरज) येथे संशोधनाचा कारखाना उभारून नवनव्या प्रयोगांना जन्म दिला. इलेक्ट्रिकल सायकल, इलेक्ट्रिकल व्हिलचेअर, मोल्डलेस कंपोझिट फायबर, सोलर पॉवरबेस इलेक्ट्रिक रिक्षा असे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत.सांगली येथील प्रा. शाम गुरव यांनी अवकाश विषयावर नेदरलँड येथे डॉक्टरेट मिळवली आहे. मद्रास येथे त्यांनी एम.टेक्‌.चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एअरक्राफ्ट डिझायनिंग क्षेत्रात काम केले. नासाच्या एका प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. सध्या ते अहमदाबाद विद्यापीठात सल्लागार म्हणून काम करीत आहेत.

परदेशात नोकरी व उद्योगाच्या अनेक संधी सोडून त्यांनी आपल्या गावातच काही तरी करण्याचा विचार त्यांनी केला. त्यातून त्यांनी ही फॅक्टरी हरिपूर येथे उभी केली. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अभियंत्यांना त्यांनी यात समावून घेतले. जिल्ह्यात शिक्षण घेऊन करिअरच्या वाटा शोधत राज्यभर फिरणाऱ्या मुलांना रोजगार आणि संशोधनाची संधी देण्याचा विचार त्यामागे असल्याने गुरव यांनी ही फॅक्टरी सुरू केली.सुरुवातीला त्यांनी अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हिलचेअरचा प्रयोग हाती घेतला. त्यात त्यांना यश मिळाले. ज्या व्हिलचेअरची बाजारात १ ते सव्वा लाख किंमत आहे, तितक्याच सुविधांची व्हिलचेअर ७५ टक्के कमी किमतीत त्यांनी तयार केली.

लॉकडाऊन काळात त्यांनी इलेक्ट्रिकल सायकल तयार केली. छोट्या मोपेडचा फिल येणाऱ्या, पण सायकलचा लूक असणाऱ्या वजनाने अत्यंत हलक्या अशा इलेक्ट्रिकल सायकलचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ही फॅक्टरी आनंद व त्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देणारी ठरत आहे.प्रा. शाम गुरव म्हणाले, प्रचंड आर्थिक कसरत करीत ही फॅक्टरी आम्ही सुरू केली. अभियंत्यांना या प्रकल्पात समावून घेताना परिसरातील गोरगरीब मजुरांनाही काम दिले आहे. फॅक्टरीची व्याप्ती वाढविताना व्यावसायिकतेपेक्षा समाजासाठी आवश्यक उपकरणांची परवडणाऱ्या दरात निर्मिती करण्याचा उद्देश आहे.

टॅग्स :scienceविज्ञानSangliसांगली