शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य ‘डासां’च्या हाती

By admin | Updated: November 14, 2014 23:23 IST

गांधी वसतिगृहातील स्थिती : जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचेही दुर्लक्ष

नरेंद्र रानडे - सांगली -जिल्हा प्रशासनाने डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. परंतु जिल्हा परिषदेपासून काही अंतरावरच असणाऱ्या महात्मा गांधी शासकीय वसतिगृहात प्रशासन राबवित असलेल्या अस्वच्छता अभियानामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडुपे, सांडपाण्याच्या निचऱ्याचा अभाव, परिसरातच फेकण्यात येणारा कचरा यामुळे वसतिगृहात प्रचंड प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. जिल्हा परिषदेपासून जवळच असणाऱ्या शासकीय वसतिगृहातील अस्वच्छतेकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. महात्मा गांधी वसतिगृहात सध्या १४३ विद्यार्थी निवासी आहेत. तेथे सुरक्षारक्षक असून नसल्यासारखाच आहे. यामुळे रस्त्यावर फिरणारी डुकरे, मोकाट कुत्री यांचा वसतिगृहाच्या आवारात मुक्त संचार आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, यासाठी वसतिगृहाने क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. परंतु सध्या तेथे प्रचंड प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत. त्यामध्येच परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार समाजकल्याण विभागाकडे पाठपुरावा करुनही स्वच्छता करण्याची केवळ आश्वासने देण्यात येत आहेत. डासांची उत्पत्ती होऊ न देण्यासाठी सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे. परंतु स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस सांडपाणी साठले आहे. पाणी साठू नये यासाठी प्रशासनातर्फे अद्याप उपाययोजना नाहीत. डास निर्माण होऊ नयेत यासाठी साठलेल्या पाण्यावर रॉकेल टाकणे अत्यावश्यक आहे. सायंकाळनंतर परिसरात डासांचे साम्राज्य पसरत आहे. विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यास करण्यापेक्षा डासांपासून बचाव करण्याच्या उपाययोजना करण्यात जात आहे. डेंग्यूच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वसतिगृहातील परिसर स्वच्छ करावा, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनीच राबविली स्वच्छता मोहीमवसतिगृह परिसरात स्वच्छता करावी यासाठी विद्यार्थ्यांनी सतत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु तेथील अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने डेंग्यूच्या वाढत्या फैलावामुळे धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविली आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील खोल्यांशेजारी वाढलेली झुडपे काढून टाकली आहेत.वसतिगृह निरीक्षक गायबवसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांची कार्यवाही करण्यासाठी प्रशासन निरीक्षकाची नेमणूक करते. परंतु या वसतिगृहात कोणी निरीक्षकच नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. साहजिकच कोणतीही समस्या उद्भवली, तर त्यांना थेट जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागातच धाव घ्यावी लागते. भविष्यकाळात वसतिगृहात कायमस्वरूपी निरीक्षकाची नेमणूक करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.