शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कासेगावात विधवांसाठी हळदी-कुंकू

By admin | Updated: February 7, 2017 23:14 IST

हरिप्रिया महिला मंडळाचा उपक्रम : जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

इस्लामपूर : पतीच्या निधनानंतरही हिमतीने कुटुंबाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या महिलांचा खास मान, सन्मान व्हायला हवा़. मात्र समाजात उलटेच घडते़ रूढी, परंपरांचा भाग म्हणून सणा-समारंभात त्यांना डावलले जाते. शिवाय त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही चुकीचा असतो. अशा विधवा भगिनींना एकत्र करून त्यांना हळदी-कुंकवाचा मान देण्याचा क्रांतिकारी उपक्रम कासेगाव (ता. वाळवा) येथील हरिप्रिया महिला मंडळाने राबविला़ त्यास महिलांचाही प्रतिसाद मिळाला़ कासेगाव येथील सौ़ नंदिनी दिलीप पाटील व काही महिला गेल्या १०-१२ वर्षांपासून या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहेत़ यावेळी विधवा भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती अंजना तोडकर, प्रा़ श्रीमती प्रतिभा पवार, आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केलेल्या श्रीमती एम़ आय़ तांबोळी, आश्रमशाळेच्या संचालिका श्रीमती जयश्री चौधरी यांच्यासह २५ विधवा भगिनींनी कार्यक्रमास हजेरी लावली़ हळदी-कुंकवाचा मान आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. आम्ही पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलत पुढे जात आहोत. यामध्ये आपली साथ नवी उभारी देणारी आहे, अशा शब्दात काही भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सौ़ नंदिनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ़ सुजाता माने, सौ़ सारिका किर्वे, सौ़ गौरी कुलकर्णी, सौ. वैशाली कुलकर्णी, सौ़ सुवर्णा शहा, सौ़ स्वाती जगताप, सौ़ रोहिणी रणदिवे, सौ़ शोभा शहा, सौ़ दीपाली विभुते, सौ़ सरिता विभुते, सौ़ मधुरा कुलकर्णी, सौ. रजनी कुलकर्णी, सौ. सुनंदा कुलकर्णी, सौ़ अलका शहा, सौ़ उमा कुलकर्णी, सौ़ स्मिता कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या़ सौ़ स्वाती वाकळे यांनी आभार मानले़ सौ़ मीरा काळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)