शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

खानापूर तालुक्यात गुरुजींची ‘फिल्डिंग’

By admin | Updated: March 11, 2015 00:05 IST

शिक्षक बँक निवडणूक : तिरंगी लढतीत रंगत

विटा : प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यात शिक्षकांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. महिनाभरावर येऊन बॅँकेच्या निवडणुकीत इच्छुकांची मांदियाळी असून, प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघाचे दोन गट अशी तिरंगी लढत झाल्यास खानापूर तालुक्यातील सहा उमेदवारांना संधी मिळणार आहे.विविध वादांमुळे चर्चेचा विषय ठरणारी प्राथमिक शिक्षक बॅँक शालेय वार्षिक परीक्षेच्या अंतिम टप्प्यात गुरुजींच्या मोर्चेबांधणीमुळे आणखी प्रकाशात आली आहे. तालुक्यातील अनेक गुरुजींनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. खानापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ (शि. द. पाटील गट) व शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट) अशा तीन संघटना आहेत. या बॅँकेचे विटा शहरासह खानापूर तालुक्यात सुमारे ४६५ सभासद मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत माहुली येथील महेश शरनाथे व सतीश पाटील समितीतून निवडून आले. त्यावेळी संघाचे उमेदवार प्रभाकर भोसले व धनाजी घाडगे यांचा त्यांनी पराभव केला. सतीश पाटील यांनी अध्यक्षपदाची मुदत संपताच समितीला रामराम ठोकला. सध्या ते थोरात गटात आहेत. शिक्षक समितीचे खानापूर तालुकाध्यक्ष म्हणून मोहन शिंदे (लेंगरे), शि. द. पाटील गटाचे संतोष जगताप (बामणी) व संभाजी थोरात गटाचे धनाजी घाडगे (देविखिंडी) हे तालुकाध्यक्ष आहेत.बॅँकेची निवडणूक व संघटना बांधणीतून शिल्लक राहिलेल्या वेळेत शिक्षकांनी अध्यापन सुरू केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुलांचे भवितव्य अधांतरी आहे. (वार्ताहर)तालुक्यातील इच्छुकबँकेत खानापूर तालुक्यातील दोन संचालक असतात. यावेळी ही निवडणूक तिरंगी होणार आहे. शिक्षक समितीचे महेश शरनाथे (माहुली), प्रकाश चव्हाण (खानापूर), राजाराम शिंदे (भाळवणी) व बाळासाहेब आडके (जोंधळखिंडी) हे, तर शिक्षक संघातील थोरात गटाचे सतीश पाटील (माहुली), सुनील गुरव (चिखलहोळ), धनाजी घाडगे (देविखिंडी) आणि शि. द. पाटील गटातील प्रभाकर भोसले (माहुली), संतोष जगताप (बामणी) व राजू राजे (वाझर) इच्छुक आहेत.ॉँकेवर माहुलीने आजपर्यंत वर्चस्व कायम ठेवले. सुरुवातीला शि. या. माने, ज्ञानदेव भोसले, मोहन शरनाथे, सतीश पाटील हे सर्वजण माहुली गावचे आहेत. या सर्वांनी संचालक व अध्यक्षपद भूषविले. अध्यक्ष महेश शरनाथे माहुलीचेच रहिवासी आहेत.