शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंचे आझाद मैदानात आंदोलन सुरु, हजारो मराठा आंदोलक मुंबईत
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
5
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
6
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
7
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
8
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
9
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
10
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
11
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
12
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
13
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
14
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
15
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
16
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
17
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
18
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
19
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

ऐंशी कामे रद्द करून गुडेवारांचा ठेकेदारांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील ८० विकास कामांच्या निविदा ठेकेदाराने मॅनेज करून भरल्याचा प्रकार जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ...

सांगली : जिल्ह्यातील ८० विकास कामांच्या निविदा ठेकेदाराने मॅनेज करून भरल्याचा प्रकार जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी ती कामे रद्द करून त्याची फेरनिविदा काढली. यावरून सोमवारी जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत तीव्र पडसाद उमटले. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा आदेश झिडकारून गुडेवार फेरनिविदांच्या भूमिकेवर ठाम होते.

सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्‌वारे जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या बैठकीस सर्व पदाधिकारी आणि समितीचे सदस्य, खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीसच निविदा निघाल्यानंतर नियमानुसार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. तरीही बांधकाम विभाग आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांनी आटपाडी, शिराळा, तासगाव, पलूस येथील विकास कामांच्या निविदा का रद्द केल्या आहेत, असा सवाल काही सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

यावर गुडेवार यांनी, ८० निविदा ठरवून तीन ठेकेदारांनी कामाच्या अंदाजपत्रकाएवढ्याच दराने भरल्या आहेत. यामुळेच आटपाडी तालुक्यातील १६ आणि शिराळा तालुक्यातील दोन कामे रद्द करून दि. १९ एप्रिललाच फेरनिविदा प्रसिध्द केल्या आहेत. उर्वरित ६४ कामांच्या निविदाही सोमवार दि. २६ एप्रिल रोजी फेरनिविदा प्रसिध्द केल्या आहेत. नियमानुसार फेरनिविदा रद्द करून जुन्या निविदाप्रमाणे कामांना मंजुरी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. यावरून पदाधिकारी, सदस्य आणि गुडेवार यांच्यात ऑनलाईन सभेतही जोरदार गोंधळ झाला. पण, अखेरपर्यंत गुडेवार ८० कामे रद्दच्या भूमिकेवर ठाम होते. यामुळे जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि गुडेवार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चौकट

तासगावमध्ये निविदा मॅनेजची बैठक

जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या निविदा प्रत्येक ठेकेदाराने मॅनेज करून भरण्याचा निर्णय तासगाव येथील ठेकेदारांच्या बैठकीत झाला. त्यानुसारच प्रत्येक ठेकेदाराने एका कामासाठी तीन निविदा विविध ठेकेदारांच्या नावावर भरण्याचा निर्णय केला खरा, पण ठेकेदारांचा तो डावही चंद्रकांत गुडेवारांनी उधळून लावला. ऐंशी कामे रद्द केल्यामुळे ठेकेदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

चौकट

अध्यक्षा म्हणतात... जुन्या निविदानुसारच कामे

ऐंशी कामे रद्द केल्याबद्दल विचारले असता जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, जादा दराने निविदा भरल्या, म्हणून निविदा रद्द करता येत नाहीत. यामुळे ६४ कामांच्या काढलेल्या फेरनिविदा रद्द करून जुन्या निविदानुसारच कामे होतील. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

चौकट

ब्रम्हदेव आला तरी फेरनिविदा रद्द नाही : गुडेवार

जिल्ह्यातील विकास कामांची ८० कामे मॅनेज करून भरल्याचे चौकशीत सिध्द झाले आहे. म्हणूनच ती कामे कायदेशीर प्रक्रिया करून रद्द केली आहेत. त्यानंतर दि. १९ एप्रिलला १६ कामांची निविदा प्रसिध्द झाली असून ६४ कामांची निविदा सोमवार दि. २६ एप्रिल रोजी प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे ब्रम्हदेव आला तरीही फेरनिविदा रद्द होणार नाही, असे ठाम मत चंद्रकांत गुडेवार यांनी मांडले.