शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

GSTने बिघडवला ढोल, ताशा, झांजेचा ‘सूरताल’; गणेशोत्सवात करवाढ, १२ ते १८ टक्के कर लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:16 IST

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना देशभरातून मागणी आहे

सदानंद औंधे, लोकमत न्यूज नेटवर्क, मिरज (जि. सांगली) : सण, उत्सवासाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार या तयार वाद्यांना जीएसटी नाही. मात्र, वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांना १२ ते १८ टक्के जीएसटी लागू केल्याने ही वाद्ये महागली आहेत.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना देशभरातून मागणी आहे. तंतूवाद्यांसोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी वारकरी, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी सर्व वाद्ये मिरजेत मिळतात. श्रावण व गणेशोत्सवात वाद्यांना मागणी असल्याने दरवर्षी मिरजेत कोट्यवधींची उलाढाल होते. येथे ढोलताशा, पखवाज, ढोलकी, वीणा, संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग, तबला डग्गा, हार्मोनियम ही वाद्ये मिळतात.पंढरपूर, आळंदी, पैठण यांसह देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व मंदिरात मिरजेतून वाद्ये जातात. मात्र, जीएसटी लागू केल्याने सर्वच वाद्यांचा स्वर महागला आहे. त्यामुळे कलावंतात नाराजी आहे.

सध्याच्या वाद्यांच्या किमती

  • धनगरी ढोल लाकडी- ५ ते १२ हजार
  • स्टील ढोल- २ ते ४ हजार
  • ढोलकी- २ ते ३ हजार
  • हार्मोनियम- ८ ते २५ हजार
  • तबला डग्गा- ४ ते ६ हजार
  • संबळ- दीड हजार रुपये जोडी
  • टाळ- ३०० ते १२०० रुपये
  • ताशा स्टील- ८०० रुपये
  • तांबे पितळेचा ताशा- ५ ते १५ हजार
  • झांज- ५०० ते १५०० रुपये
  • आरती मशिन- ९ ते १३ हजार

मिरजेत वाद्यांच्या बाजारपेठेत दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र, वाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर जीएसटी आकारणी झाल्यामुळे वाद्ये दहा ते पंधरा टक्के महागली आहेत.- संजय मिरजकर, वाद्य विक्रेते, मिरज

टॅग्स :GSTजीएसटीGanesh Mahotsavगणेशोत्सव