शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ने महसुलात १५% वाढ एकूण कर ८७२ कोटींवर : चालू आर्थिक वर्षात कडक अंमलबजावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:43 IST

मिरज : वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गतवर्षी नऊ महिन्यात सुमारे १५ टक्के जादा कर संकलन झाले आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षीचा ७७७ कोटी कर वसुलीचा आकडा

मिरज : वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गतवर्षी नऊ महिन्यात सुमारे १५ टक्के जादा कर संकलन झाले आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षीचा ७७७ कोटी कर वसुलीचा आकडा यावर्षी ८७२ कोटींवर पोहोचला आहे. करदात्यांच्या नोंदणीतही दहा टक्के वाढ झाली आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यात उत्पादन शुल्क, व्हॅट, सीएसटी आदी करांची वसुली करण्यात येत होती. गतवर्षी जिल्ह्यातील दहा तालुक्यात २० हजार नोंदणीकृत व्यावसायिकांकडून ७७७ कोटी करवसुली झाली होती. १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर नोंदणीकृत २० हजार करदात्यांपैकी ६ हजार करदाते कमी झाले, तर आठ हजार नवीन करदात्यांनी नोंदी केल्या आहेत. २२ हजार व्यावसायिकांकडून चालू आर्थिक वर्षात ८७७ कोटी करवसुली झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यातील साखर कारखाने, अन्न प्रक्रिया उद्योग, औद्योगिक संस्था, गृहबांधणी व्यावसायिक, बांधकाम ठेकेदार यांसह पायाभूत सुविधा देणाऱ्या व्यावसायिकांकडून ३ ते २८ टक्के वस्तू व सेवा कराच्या वसुलीद्वारे कर संकलनात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

नोंदणीकृत व्यावसायिकांपैकी ३० टक्के व्यावसायिकांनी वेगवेगळ्या करामुळे अद्याप कर भरलेला नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह त्यांची करवसुली झाल्यानंतर महसुलात आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. वस्तू व सेवा कराची आकारणी सुरू झाल्यानंतर पहिल्यावर्षी करदात्यांच्या संख्येत दहा टक्के वाढ झाली आहे. सुरुवातीला गुंतागुंतीची व क्लिष्ट असलेली जीएसटी कर प्रक्रिया सोपी झाल्यामुळे व मालवाहतुकीसाठी ई-पे बिलाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे करदात्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. वस्तू व सेवा कराची आकारणी सुरू झाल्यानंतर पहिल्यावर्षी करदात्यांचे प्रबोधन करण्यात आले.

यावर्षी जिल्ह्यातील कोणत्याही उद्योजक व व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आलेले नाहीत. खटले दाखल करण्यात आलेले नाहीत. केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र यापुढील काळात वस्तू व सेवा कर वसुलीसाठी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात येणार आहे.पथके नियुक्त : ई-पे तपासणी होणार५० हजारपेक्षा जादा किमतीच्या माल वाहतुकीसाठी ई-पे बिलाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कागल व चंदगड येथे चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातही म्हैसाळ ते जतपर्यंत २२० किलोमीटर कर्नाटक सीमा असल्याने, रस्ते तपासणी पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. मालवाहतूक करणाºया वाहनांच्या ई-पे बिलाची तपासणी या पथकामार्फत करण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीGSTजीएसटी