शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

थकीत १८ कोटींचा जीएसटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 10:59 IST

सांगली जिल्ह्यातील थकीत सेवाकर व जीएसटीच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या सबका विश्वास योजनेला थकबाकीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, बुधवारी अखेरच्या मुदतीत सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५५० थकबाकीदारांनी सहभाग घेतला. त्यांना शंभर कोटी रुपयांची सवलत मिळाली असून, जीएसटी विभागास यातून १८ कोटी मिळणार आहेत.

ठळक मुद्देथकीत १८ कोटींचा जीएसटी मिळणारशंभर कोटी रुपयांची सवलत

सांगली : जिल्ह्यातील थकीत सेवाकर व जीएसटीच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या सबका विश्वास योजनेला थकबाकीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, बुधवारी अखेरच्या मुदतीत सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५५० थकबाकीदारांनी सहभाग घेतला. त्यांना शंभर कोटी रुपयांची सवलत मिळाली असून, जीएसटी विभागास यातून १८ कोटी मिळणार आहेत.योजनेअंतर्गत ५० लाखांपर्यंतच्या थकबाकीत ७० टक्के सवलत आणि ५० लाखांवरील थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला योजनेची मुदत डिसेंबरअखेरची होती, नंतर ती १५ जानेवारीपर्यंत वाढविली होती. बुधवारी ही मुदत संपली. रात्री उशिरापर्यंत थकबाकीदारांनी योजनेतील सहभागासाठी प्रयत्न चालू ठेवले होते.

मुदतीअखेर जवळपास ७८ टक्के थकबाकीदारांनी योजनेअंतर्गत नोंदणी करून सवलतीनंतर देय असणारी रक्कम भरण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे १८ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीची हमी जीएसटी विभागाला मिळाली आहे. थकबाकीदारांना १०० कोटींची सवलत मिळण्याचे निश्चित झाले.महापालिका व जिल्हा परिषदेसही जीएसटी विभागाने थकबाकीच्या नोटिसा बजावल्या होत्या. या स्थानिक स्वराज्य संस्था भाडेतत्त्वावर इमारती देत असताना त्यांचा सेवाकर भरला नव्हता. महापालिकेकडे अशी सुमारे ८० लाखांची, तर जिल्हा परिषदेकडे सुमारे ८ लाखांची थकबाकी होती.

महापालिकेने यापूर्वी २० लाख भरले होते. आता योजनेतील सहभागामुळे थोडीच रक्कम भरून त्यांना उर्वरित ६० लाखांत मोठी सवलत मिळणार आहे. जिल्हा परिषदेलाही सुमारे ३ लाख रुपये भरून उर्वरित रकमेच्या सवलतीचा लाभ होणार आहे.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयSangliसांगली