शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

नव्या पिढीचे वाढते ज्ञान शिक्षकांसाठी आव्हान

By admin | Updated: October 14, 2016 01:15 IST

जयंत पाटील : जिल्हा परिषदेच्यावतीने २६ जणांचा ‘जिल्हा शिक्षक पुरस्कारा’ने सन्मान; शिक्षक भारावले

सांगली : सध्या मुलांमध्ये टीव्हीचे आकर्षण वाढत चालले असून, सहजपणे स्मार्टफोन हाताळणाऱ्या नव्या पिढीमध्ये विशेषत: मुलांमध्ये ज्ञान फार वेगाने वाढत आहे. हे ज्ञान त्यांच्यामध्ये टिकणे व त्याद्वारे त्यांची प्रगती होणे अपेक्षित असल्याने, नव्या पिढीचे हे वाढते ज्ञान शिक्षकांसमोरील नवीन आव्हान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत केले. जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील होत्या. आ. पाटील म्हणाले की, सध्या माहितीशास्त्र वेगाने वाढत आहे. ज्ञानाची दारे उघडल्याचे चांगले चित्र यामुळे समोर आले आहे. त्यातूनच ग्रामीण भागातील मुलेही शिक्षणासाठी देश-विदेशात जात आहेत. वाढलेल्या ज्ञानाच्या कक्षेमुळे पुढे जाण्याची स्पर्धाही तीव्र झाली आहे. त्यातूनही मराठी माध्यमाचा विद्यार्थी जगात गुणवत्ता सिध्द करत आहे. त्यामुळे शिक्षकांसमोरील आव्हाने अधिक बिकट आणि प्रभावी झाली आहेत. जिल्हा परिषद शाळांची प्रगती लक्षात घेता, याठिकाणचे शिक्षक हे आव्हान निश्चितपणे पेलतील. गोरगरिबांना शिक्षण देणारी शाळा म्हणून आजही जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे. हे भान शिक्षकांमध्ये असल्यानेच अलीकडील काळात शाळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे. एखादी गोष्ट मनावर घेतली की काय बदल होऊ शकतो, हे शिक्षकांनी दाखवून दिले आहे. शिक्षकांना स्वातंत्र्य देण्यात महत्त्वाची भूमिका आघाडी सरकारने बजावली होती. समायोजनासारखी यंत्रणा उभारून शिक्षकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठीही आमच्या सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही पाटील यांनी सांगितले. स्नेहल पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या या शिक्षकांचा यथोचित गौरव व्हायलाच पाहिजे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ होत असून, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुनंदा पाटील, समाजकल्याण सभापती कुसूम मोटे, शिक्षणाधिकारी महेश चोथे, नीशादेवी वाघमोडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुरस्कारप्राप्त शिक्षक...प्राथमिक विभाग - शिवाजी पाटील (शिराळा), शरद पाटील (वाळवा), बाळासाहेब भोसले (मिरज), मुनाफ नदाफ (तासगाव), महेशकुमार चौगुले (पलूस), मंगेश बनसोडे ( कडेगाव), स्वाती शिंदे ( खानापूर), मोहिनी मुढे (आटपाडी), तारीश आत्तार (कवठेमहांकाळ), गुंडा मुंजे (जत), सातलिंगा किट्टद (जत), मुश्ताक अहमद पटेल (कुपवाड).माध्यमिक विभाग - दिलीप वाघमोडे (जत), प्रमोद डोंबे (आटपाडी), विजय सगरे (खानापूूर), हारूण जमादार (तासगाव), विजयकुमार पाटील (कवठेमहांकाळ), संजीवनी मोहिते (पलूस), बाळासाहेब माने (कडेगाव), दादासाहेब पाटील (मिरज), विठ्ठल मोहिते (म.न.पा. क्षेत्र), मैमुन्निसा तांबोळी (वाळवा), संजय पाटील (शिराळा), उल्हास माळी (जत), संदीप रोकडे (शिराळा), अनुजा पाटील (मिरज). शिक्षकांच्या मनोगताने जयंतरावही प्रभावित ‘शिक्षक पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या मनोगताने जयंत पाटील प्रभावित झाले होते. वाळवा तालुक्यातील शिक्षक शरद पाटील, कार्वे येथील कवयित्री स्वाती शिंदे, अनुजा पाटील यांचे मनोगत प्रभावी झाले. शरद पाटील यांनी सादर केलेल्या गाण्याला जयंतरावांनी दाद दिली. तसेच स्वाती शिंदे यांचे ओघवत्या शैलीतील भाषण ऐकून, त्यांना थेट जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे उभे राहण्याची आॅफरच जयंतरावांनी देऊन टाकली.इंग्रजी शाळांच्या फॅशनला आळापाच वर्षापूर्वीपर्यंत खेड्यापाड्यातही सुटा-बुटातील विद्यार्थी आणि त्यांचे इंग्रजी बोलण्याचे पालकांना अप्रूप होते. मात्र, जिल्हा परिषद शाळांनी हे आव्हान पेलत गुणवत्ता वाढविल्याने, आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फॅशन कमी केली आहे. याचे श्रेय प्राथमिक शिक्षकांच्या प्रयत्नाला द्यायला हवे, असेही जयंत पाटील म्हणाले.