शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

वाढत्या थंडीचा द्राक्षाला फटका

By admin | Updated: December 22, 2016 00:09 IST

जत तालुक्याचे चित्र : मण्यांची फूग संथ

गजानन पाटील ल्ल संखजत तालुक्यात १५ दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. रात्री बोचरी थंडी, दिवसा गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. गारठ्यामुळे वाढीच्या स्थितीतील द्राक्षमण्यांची फूगही संथ असून, थंडीचा परिणाम द्राक्षमण्यांच्या वाढीवर होऊ लागला आहे. तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा लावल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी जातींच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील पाणी असल्याने सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.उमदी, तिकोंडी, बिळूर, डफळापूर, रामपूर, संंख, अंकलगी, भिवर्गी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, कोंत्यावबोबलाद, करजगी, जालिहाळ बु. आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने द्राक्षबागा अडचणीत आल्या आहेत. छाटण्या झालेल्या नाहीत. टॅँकरने पाणी घालून उन्हाळ्यात कांड्या तयार केल्या आहेत. थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसावर फळबागा जगविल्या आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये थंडी वाढू लागली आहे. रात्री १० अंशापर्यंत, तर दिवसा दुपारी १२ वाजताही २२ अंशापर्यंत तापमान असते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किमान १० व कमाल २२ अंश तापमान राहील, असा अंदाज आहे. त्याचा परिणाम द्राक्षावर होत आहे.हवामानाचा फटका : रोगांची भीतीसप्टेंबरमध्ये छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांतील घडांच्या मण्यांची वाढ सुरु झाली आहे. परंतु वाढत्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या फुगवण क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्षमणी जास्त फुगू शकत नाहीत. पण सध्या पाणी उतरुन तयार झालेल्या मालावर थंडीचा फारसा परिणाम होत नाही. मात्र उर्वरित बागांमध्ये थंडी व दाट धुके पडल्यास भुरीसारख्या रोगांचा शिरकाव पुन्हा होऊ शकतो, असे द्राक्षबाग तज्ज्ञांनी सांगितले. द्राक्ष मण्यांची वाढ करण्यासाठी एसओपी खताचा वापर शेतकरी करीत आहेत. बेदाण्यावर परिणाममण्यांची फुगवण कमी होणार असल्याने चांगला दर्जेदार प्रतीचा बेदाणा तयार होणार नाही. दुय्यम प्रतीचा बेदाणा तयार होणार आहे. याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसणार आहे.