शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

जत तालुक्यात भूजल पातळीत ३.०७ मीटरची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संख : जत तालुक्यात यावर्षी पाऊस दमदार पडल्याने ३.०७ मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे. पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : जत तालुक्यात यावर्षी पाऊस दमदार पडल्याने ३.०७ मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे. पाच वर्षांतील उच्चांकी पाणी पातळी आहे. तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. रब्बी हंगामातील पिके, द्राक्षे, डाळिंब व उन्हाळी पिकांना लाभ होणार आहे. यावर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही. असे चित्र आहे. उन्हाळ्यात द्राक्ष बागांची खरड छाटणीही वेळेवर होणार आहे. डाळिंब बागांचा बहर धरला जाणार आहे. याबाबत ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यात पाच वर्षांपासून पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. पावसाअभावी रब्बी व खरीप हंगाम वाया गेला होती. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंब बागा काढून टाकल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाराची समस्या निर्माण झाली होती. जनावरांची संख्या कमी झाली होती.

पाऊस कमी असल्याने जिराईत व कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. २००९ नंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यावर्षी ७७८ मि.मी इतका पडला आहे. मुचंडी, शेगाव, संख, जत, कुंभारी, तिकोंडी या मंडल विभागात अतिवृष्टी तर उमदी, माडग्याळ मंडळात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील संख मध्यम प्रकल्प व २५ तलाव, १२ कोल्हापूर बंधारा व सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले आहेत. बोर नदीवरील सर्व बंधारे भरले आहेत. यावर्षी पुरेशी ओल झाल्याने ६२ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. डाळिंबांचा हंगाम एप्रिल मे महिन्यात बहर धरला जाणार आहे. उन्हाळी हंगामातील कापूस, भुईमूग, सुर्यफूल, हायब्रीड ही पिके येणार आहेत.

शेतकरी जनावरांना उन्हाळ्यात शेतकरी व्हांडी, कडवळ, हत्ती गवत करणार असल्याने दुभत्या जनावरांना ओल्या चा-याची सोय होणार आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी पाणी पातळी वाढल्याने टँकरची आवश्यकता भासणार आहे. शासनाचे लाखो रुपये वाचणार आहेत.

फोटो : ०१ संख १..२

ओळ : दरीबडची (ता. जत) येथील कोल्हापूर बंधारा व सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने तुडूंब भरले आहेत.