तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे नानासाहेब महाडिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाडिक युवा शक्ती यांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी दीपक पडळकर, ओंकार तोडकर, पंडित पडळकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील महाडिक युवाशक्ती यांच्या वतीने नानासाहेब महाडिक यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष दीपक पडळकर म्हणाले, नानासाहेब महाडिक यांनी नेहमी अनेक समाजहिताचे उपक्रम राबविले. राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले. नेहमीच त्यांची उणीव आम्हाला भासत राहील.
कार्याध्यक्ष ओंकार तोडकर म्हणाले, नानांच्यासारखे व्यक्तिमत्त्व सध्या उदयास येणे हे अशक्य असून तसे जर मिळाले तर तालुक्याचे भाग्य मानावे लागेल. यावेळी मास्क वापरा, गर्दी करू नका, कोरोनाचे संकट पळवून लावण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा, असेही आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊनची परिस्थिती विचारात घेऊन सर्व कार्यक्रम रद्द केले. यावेळी विशाल जाधव, दीपक पडळकर, ओंकार तोडकर, पंडित पडळकर, विशाल जाधव, ओंकार पाटील, प्रज्योत मोरे, ऋषिकेश पवार उपस्थित होते.