सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या ६१ व्या जयंतीनिमित्त विष्णुअण्णा भवन येथे उद्योजक आप्पा शिखरे व आनंद शिंदे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, प्रशांत पाटील, अमर निंबाळकर, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, शीतल लोंढे, अविनाश जाधव, धनंजय खांडेकर, अवधूत गवळी, मयुर बांगर, सोहेल बलबंड, लालसाब तांबोळी, हाजीतौफिक बिडीवाले, प्रीतम रेवणकर, रामचंद्र कुट्टी, संतोष कुरणे, प्रकाश लोखंडे, अनुप आसावा, नितीन भगत, शेखर पाटील, अक्षय दोडमणी आदी उपस्थित होते. ---------
महापालिकेत मदनभाऊंना अभिवादन
फोटो : ०३ शीतल ०२
सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि वित्त लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, आरोग्याधिकारी डॉ. चारुदत्त शहा, शैलेश भोसले, शैलेश खोत, मोहन कांबळे, विनायक जमदाडे, अरविंद कोलापुरे, सर्जेराव काळुसे, मनीषा जासूद, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते.