भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी अभिवादन केले. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सेकंडरी स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे व विश्वस्त जे.बी. चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या विविध शाखांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केल्या असल्याची माहिती सचिव संजय कुलकर्णी यांनी दिली. यावेळी विश्वस्त डॉ. सुहास जोशी, संचालक गिरीश चितळे, लीना चितळे, डॉ. सुनील वाळवेकर, संजय कदम, जयंत केळकर, प्रा. आर.डी. पाटील, प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे आदी उपस्थित होते.
160721\img_20210716_084056.jpg
भिलवडी येथे डॉ.चंद्राताई शेणोलीकर प्रतिमा पूजन प्रसंगी विश्वास चितळे,जे.बी.चौगुले,गिरीश चितळे, डॉ.सुहास जोशी,डॉ.सुनिल वाळवेकर,संजय कदम,संजय कुलकर्णी आदी.