शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

थोर स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:49 IST

थोर स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कपाचगणी : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे बुधवारी पहाटे तीन वाजता मुुंबई येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पाच मुली, सुना, पुतणे, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.२६ नोव्हेंबर १९१९ रोजी भिलार येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भि. दा. भिलारे गुरुजी यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यातूनच ते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भूमिगत चळवळीकडे ओढले गेले.गांधीजींनी देशातील तरुण वर्गाला स्वातंत्र चळवळीमध्ये उडी घेण्याचे आवाहन केल्यानंतर भिलारे गुरुजींनी स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. थोर नेत्यांच्या सहवासामुळे गुरुजींना सहकार शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.त्यांनी महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यांतील ९३ गावांचा ग्रामोन्नती संघ स्थापन करून अनिष्ठ रुढी, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. १९६२ ते १९७२ या कालावधीत ते जावळीचे आमदार होते. १९७८ ते १९८० या कालावधीत त्यांनी विधानपरिषदेचे सदस्यपद भूषविले. महाराष्ट्र राज्य प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते ४० वर्षे सदस्य होते. अलीकडच्या काळातही अनेक आमदार, खासदार हे भिलारे गुरुजींच्या मार्गदर्शन घेऊनच आपले कामकाज करीत असत. भिलारची माती पोरकी...भिलारची माती आज या गुरुजींच्या जाण्यामुळे पोरकी झाली आहे. भिलारे गुरुजींचे सर्व राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध होते. पाचगणी, महाबळेश्वरात येणारी प्रत्येक राजकीय व्यक्ती भिलारमध्ये येऊन भिलारे गुरुजींना न भेटता कधीच जात नसत.गांधीजींच्या हत्येचा कट उधळला१९४४ मध्ये महात्मा गांधी पाचगणीत आले असताना प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला हल्ला परतविण्यात भिलारे गुरुजी आघाडीवर होते. हल्ल्यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीच्या हातातील सुरा हिसकावून घेतला व गांधीजींचा पाचगणीत होणारा हत्येचा कट भिलारे गुरुजींनी उधळवून लावला होता. महात्मा गांधी यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कारगुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी हे महाबळेश्वर येथे आले व त्यांनी गुरुजींचा गौरव केला होता.