शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

तासगावातील शेतकऱ्यांच्या अनुदानाला कासवगती

By admin | Updated: March 17, 2016 00:11 IST

तालुक्यातील स्थिती : अनुदान वर्ग करण्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विलंब

 दत्ता पाटील -- तासगाव  --खरीप हंगाम वाया गेल्यामुळे शासनाकडून कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तासगाव तालुक्यासाठी १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपयांचे अनुदान प्रशासनाकडून जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र मार्चअखेरची कामे, शेतकऱ्यांच्या याद्यांची तपासणी, रकमांची जुळवाजुळव अशा तांत्रिक गोष्टीमुळे अनुदान गोगलगाईच्या गतीने पुढे सरकत आहे. शासनाचे अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी होत आहे.२०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचा खरीप हंगाम वाया गेला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी गुंठ्याला ६८ रुपयांप्रमाणे हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, वाळवा या आठ तालुक्यांसाठी पहिल्या टप्प्यात ६९ कोटी ९१ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी तासगाव तालुक्याला १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. प्रशासनाकडून लाभार्थी शेतकऱ्यांचे क्षेत्र निश्चित करुन तासगाव तालुक्यातील ६१ हजार १४५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्यासाठी ५ मार्चला जिल्हा बँककडे वर्ग करण्यात आले होते. मात्र अद्याप बँकेकडून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही. तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळाल्यास, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. मात्र अनुदान वर्ग करण्यास वेळ होत असल्याचे दिसून येत आहे. खरिपाच्या अनुदानाबाबत शेतकऱ्यांनी बँकेत चौकशी केल्यास, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनुदान खात्यावर जमा होईल, असे बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. जिल्हा बँक ताब्यात, तरीही राष्ट्रवादीचे निवेदन बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी तासगाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामध्ये खरीप हंगामासाठी शासनाकडून आलेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावी, या मागणीचाही समावेश आहे. मात्र प्रशासनाकडून जिल्हा बँकेच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले असून, बँकेकडूनच अनुदान अद्याप मिळालेले नाही. तरीही राष्ट्रवादीनेच याबाबत निवेदन दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनुदानावर एक नजर... तासगाव तालुक्यात कोरडवाहू शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ६१ हजार १४५ इतकी आहे. खरीप अनुदानासाठी प्रशासनाकडून ३२ कोटी ८० लाख २८ हजार ३३० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाकडून १८ कोटी ३३ लाख ४१ हजार ४०५ रुपये प्राप्त झाले. मिळालेला निधी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या ६० टक्के इतका वर्ग करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी ७६ लाख रुपयांचे अनुदान प्रशासनाकडे प्राप्त झाले असून, लवकरच १७ टक्क्यांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.तासगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण दुष्काळ आहे. पावसाअभावी शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान तातडीने मिळाले, तर दिलासा मिळणार आहे. मात्र प्रशासनाकडून अनुदान वर्ग करूनही बँकेकडून स्वार्थी हेतूने टाळाटाळ केली जात आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे.- महेश खराडे, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.