शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

ंकांदेमध्ये आजोबांनी वाचविले नातवाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : कांदे (ता. शिराळा) येथे खेळता-खेळता तळ्यामध्ये पडलेल्या समर्थ राहुल कुंभार (वय २ वर्षे) या नातवास त्याचे आजोबा बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांनी वाचविले. परंतु नातवाला वाचविताना तेही तळ्यातील जलपर्णीत अडकले. त्यांना परिसरातील महिलांनी काठीचा आधार देत बाहेर काढले.कांदे गावात ग्रामसचिवालयाच्या पिछाडीस बांधीव तळे आहे. त्यामध्ये जलपर्णी वनस्पती ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : कांदे (ता. शिराळा) येथे खेळता-खेळता तळ्यामध्ये पडलेल्या समर्थ राहुल कुंभार (वय २ वर्षे) या नातवास त्याचे आजोबा बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांनी वाचविले. परंतु नातवाला वाचविताना तेही तळ्यातील जलपर्णीत अडकले. त्यांना परिसरातील महिलांनी काठीचा आधार देत बाहेर काढले.कांदे गावात ग्रामसचिवालयाच्या पिछाडीस बांधीव तळे आहे. त्यामध्ये जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंगळवारी, १५ आॅगस्टरोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान समर्थ हा बालक खेळत खेळत तळ्याजवळ गेला व पाण्यात पडला. तो पाण्यात बुडू लागला. यावेळी जवळच असलेले त्याचे आजोबा बाळासाहेब कुंभार यांना तो बुडताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच पाण्यात उडी मारली आणि समर्थला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी समर्थला पाण्याबाहेर काढलेही. मात्र ते या तलावातील जलपर्णीच्या विळख्यात अडकले. त्यांना त्यातून सुटका करून घेता येत नव्हती.यावेळी येथील रस्त्यावरून जाणाºया सुवर्णा कुंभार, प्रियांका पाटील, रंजना कुंभार या महिलांनी ही घटना पहिली. त्यांनी प्रसंगावधान राखत बाळासाहेब कुंभार यांना काठीचा आधार देऊन तलावातून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले.यापूर्वी दोन बळी..!जलपर्णीमुळे कांदेतील हा तलाव धोकादायक बनला आहे. या तलावात याअगोदर दोन व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.