शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकार जीएसटी वसुल करते, मग आरटीओने अडवण्याचे कारण काय?; वाहतूकदार संघटनांचा सवाल 

By संतोष भिसे | Updated: August 11, 2023 14:28 IST

वाहतूकदार संघटनेने आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील चेक पोस्टविरोधात आक्रमक भूमिका घेतली

सांगली : सरकार जीएसटी वसुल करते, मग आरटीओने पुन्हा रस्त्यावर अडवण्याचे कारण काय? असा खडा सवाल वाहतूकदार संघटनांनी केला आहे. विविध राज्यांच्या सीमांवरील चेक पोस्ट त्वरित हटविण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय वाहतूकदार संघटनेची महापंचायत मध्य प्रदेशात भोपाळ येथे दोन दिवसांपूर्वी झाली. यावेळी महाराष्ट्रातूनही प्रतिनिधी हजर होते. विविध राज्यांच्या सीमांवर अडवणुकीसाठी निर्माण केलेले आरटीओ चेक पोस्ट त्वरित हटविणे हा मुद्दा महापंचायतीच्या केंद्रस्थानी चर्चेला होता. संघटनेच्या मध्य प्रदेशातील पदाधिकाऱ्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मागणीला यश आले.मध्य प्रदेशातील सर्व चेक पोस्ट टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पहिल्या टप्प्यात सात तात्पुरते व सहा कायमस्वरुपी तपासणी नाके ततडीने बंद करण्याची ग्वाही दिली. उर्वरित सर्व नाके १४ डिसेंबरपर्यंत बंद केले जाणार आहेत. या निर्णयानंतर वाहतूकदार संघटनेने आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील चेक पोस्टविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या महापंचायतीला वाहतूकदार संघटनेचे प्रकाश गवळी, बाळासाहेब कलशेट्टी, राजेंद्र दाईंगडे, प्रकाश केसरकर, जयंत सावंत, अंजू सिंगल व सचिन  जाधव आदी उपस्थित होते.

नाक्यांवर आरटीओकडून अडवणूकवाहतूकदार संघटनेचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी यांनी सांगितले की, शासनाने कर आकारणीसाठी सूक्ष्म पातळीवर हातपाय पसरले आहेत. कराच्या जाळ्यातून कोणीही सुटत नाही. जीएसटीमुळे प्रत्येक उत्पादन आणि सेवाक्षेत्र कर आकारणीमध्ये समाविष्ट झाले आहे. या स्थितीत रस्त्यावर चेकपोस्ट उभारुन वाहनांची अडवणूक करणे योग्य नाही. या नाक्यांवर आरटीओकडून वाहनचालकांची अडवणूक आणि आर्थिक पिळवणूक होते. याविरोधात संघटनेने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

टॅग्स :SangliसांगलीRto officeआरटीओ ऑफीसGSTजीएसटी