शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँका संपविण्याचा सरकारचा डाव; दिलीपतात्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:53 IST

देशातील ८0 टक्के आर्थिक घोटाळे हे राष्टÑीयीकृत बँकांमध्ये झाले असताना, सहकारी बँकांवर नियंत्रणासाठी व्यवस्थापन मंडळाचा घाट घातला आहे. वास्तविक सहकारी बँका संपविण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने व पर्यायाने सरकारने हा

ठळक मुद्देघोटाळेबाज राष्टयीकृत बँकांवर मंडळ नेमावे

सांगली : देशातील ८0 टक्के आर्थिक घोटाळे हे राष्टÑीयीकृत बँकांमध्ये झाले असताना, सहकारी बँकांवर नियंत्रणासाठी व्यवस्थापन मंडळाचा घाट घातला आहे. वास्तविक सहकारी बँका संपविण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने व पर्यायाने सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी टीका सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.पाटील म्हणाले की, सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेमार्फत व्यवस्थापन मंडळ नियुक्तीचा दिलेला प्रस्तावअत्यंत चुकीचा आणि सरकारी कूटनीतीचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. राज्यातील सहकारी बँकांचे काम हे राष्टÑीयीकृत बँकांच्या कितीतरी पटीने चांगले आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी काढली, तर ८० टक्क्यांहून अधिक घोटाळे राष्टÑीयीकृत बँकांमध्ये झाले. त्याठिकाणचे ठेवीदार धास्तावले आहेत. याउलट सहकारी आणि विशेषत : जिल्हा बँकांच्या ठेवींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आमच्याकडील ठेवीदारांची चिंता करण्यापेक्षा राष्टÑीयीकृत बँकांमधील ठेवीदारांची चिंता रिझर्व्ह बँकेने करायला हवी होती.

रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात नेमलेली समिती ही केवळ सहकारी बँकांसाठीच का नियुक्त केली, हासुद्धा संशयाचा विषय आहे. एवढे मोठे आर्थिक घोटाळे करणाऱ्या राष्टÑीयीकृत बँकांबाबत धोरण ठरविण्यासाठी एखादी समिती का नियुक्त केली नाही? सहकारी बँकांना या ना त्या मार्गाने अडचणीत आणण्याचा उद्योग गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाला आहे. यापूर्वी जिल्हा तसेच अन्य सहकारी बँकांच्या चौकशा रिझर्व्ह बँकेने केल्या. त्यात त्यांना एक रुपयाचाही घोटाळा आढळून आला नाही. आर्थिक घोटाळ्यांची तपासणी करणाºया अनेक यंत्रणा येऊन चौकशी करून गेल्या. दुसरीकडे घोटाळ्यामागून घोटाळे करणाºया राष्टÑीयीकृत बँकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्याठिकाणी चौकशी करण्याची तसदी जाणीवपूर्वक घेतली गेली नाही. हा दुजाभाव आता जनतेलाही कळलेला आहे. जिल्हा बँकांमधील कर्जवाटप व अन्य धोरणांवर नियंत्रण राहावे, म्हणून यापूर्वीच जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती केली गेली आहे. तरीही पुन्हा आणखी एक व्यवस्थापन मंडळ नेमण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने देऊन, सहकारी बँकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.जिल्हा बँकांमार्फत विरोध नोंदवूया प्रस्तावावर २४ जुलैपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासंदर्भात राज्यातील जिल्हा बँका, सहकारी बँकांमार्फत आम्ही विरोध दर्शविणार आहोत. त्यापूर्वी आम्ही बँकिंग क्षेत्रातील लोक एकत्र येऊन निर्णय घेऊ, असेही दिलीपतात्या पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र