शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सरकार म्हणते निधी दिला, अधिकारी म्हणतात, कल्पना नाही...मिरज-पेठ रस्त्याच्या निधीचा गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:59 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राष्टÑीय व राज्य महामार्गांच्या निधीचा पाऊस सध्या जिल्ह्याला चिंब भिजवित असल्याचे ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राष्टÑीय व राज्य महामार्गांच्या निधीचा पाऊस सध्या जिल्ह्याला चिंब भिजवित असल्याचे चित्र भाजपने निर्माण केले आहे. मात्र, निधीचा भासही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब समोर आली आहे. मिरज-सांगली-पेठ राष्टÑीय महामार्गासाठी तब्बल १२०० कोटी रुपये मंजूर झाल्याची जाहिरात शासनाने प्रसिद्ध केली. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर या निधीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील महामार्गांसाठी मंजूर झालेल्या ७ हजार ११४ कोटी रुपयांच्या निधीबाबतची जाहिरात शासनाने प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील अशा रस्त्यांच्या यादीत मिरज-सांगली-पेठ असा राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ एच समाविष्ट केला आहे. ६० किलोमीटरच्या या रस्त्यासाठी १२०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे स्पष्टपणे त्यात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक या संपूर्ण महामार्गाचा विचार केला तर केवळ सांगली-पेठ नाक्यापर्यंतचा रस्ता सध्या राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाला आहे. मिरज ते सांगली हा तुकडा राष्टÑीय नव्हे, तर राज्य महामार्ग म्हणून गणला जातो. मिरज ते सांगली हा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, तर सांगली-पेठ हा भाग राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत आहे. अद्याप राष्टÑीय महामार्गात हे दोन्ही मार्ग एकत्रित आलेच नसताना, या संपूर्ण मार्गासाठी निधी मंजूर झालाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.बाराशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे प्रसिद्ध झाले असले तरी, तसा कोणताही आराखडा शासनाकडे अद्याप सादर झालेला नाही. इतक्या मोठ्या निधीच्या मंजुरीचे पत्रही कोणत्याही शासकीय कार्यालयास प्राप्त झाले नाही. तरीही गेल्या काही दिवसांपासून या निधीच्या मंजुरीचे गोडवे गायले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर बाराशे कोटी रुपयांच्या मंजुरीचे पत्र आले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निधीचा गोलमाल समोर आला आहे. याशिवाय चौपदरीकरणाचे हे काम करताना मिरज ते सांगली आणि सांगली ते पेठ असा टप्पा गृहीत धरला आहे. मिरजेहून आलेला चारपदरी रस्ता सांगलीच्या राम मंदिरपर्यंत थांबतो. तिथून चौपदरी नव्हे, तर दुपदरी करण्याची कोणतीही संधी दिसत नाही. दुसºया पर्यायी मार्गाचा विचार केला तर बायपासपर्यंत जाणारे रस्तेही अरुंद व अडचणीचे आहेत. या रस्त्याचा आराखडा किंवा चर्चासुद्धा कधी झालेली नाही. राम मंदिर ते सांगलीवाडीपर्यंतचे किंवा अन्य मार्गाने बायपास रस्त्यापर्यंचे चौपदरीकरण कुठून करणार, याचीही कोणाला कल्पना नाही. त्यामुळे हा एकप्रकारचा शासकीय गोंधळ आहे.वास्तविक आजवर महामार्गांच्या निधी व कामाच्या माध्यमातून येथील जनतेचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. सांगली-पेठ रस्त्याबद्दल नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी आंदोलने केल्यानंतर सत्ताधाºयांना जाग आली आणि तातडीने हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट केला. त्याचे कामही सुरू केले. तरीही गेल्या दीड वर्षापासून हे काम अर्धवट स्थितीत आहे. तुंगपर्यंतचा रस्ता अत्यंत यातनादायी बनला आहे. वर्षानुवर्षे निधी मंजूर होऊनही तो व्यवस्थित खर्च झालेला नाही. अशातच निधीचा हा गोड मुलामा या प्रश्नाला लावला जात आहे.निधी मंजूर : कसा झाला?कोणत्याही रस्त्यासाठी निधी मंजूर होताना त्याचा किमान आराखडा तयार करावा लागतो. आराखडा करताना रस्त्याची पाहणी, त्याची मोजमापे व भौगोलिक परिस्थिती, अडथळे, भूसंपादन अशा सर्व गोष्टींचा विचार करून त्याबाबतच्या खर्चाचा समावेश करावा लागतो. आराखड्यासह एक प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा लागतो. त्यानंतर त्याची विविध समित्यांकडून छाननी होऊन अंतिम मंजुरी दिली जाते, मात्र मिरज-सांगली-पेठ अशा मार्गाचा कोणताही आराखडा किंवा प्रस्तावच तयार नाही. तरीही निधी कोणत्या गोष्टीवर मंजूर झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गोष्टीची कल्पना बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनासुद्धा नाही.अधिकारी म्हणतात, कल्पना नाही...राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी बाराशे कोटी आणि एकूणच या मार्गाबाबत काही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. बांधकाम विभागानेही मिरज-सांगली रस्त्याच्या हस्तांतरणाबाबत कोणतेही आदेश नसल्याचे स्पष्ट केले.