शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोकरीतील आरक्षण संपविण्याचा सरकारचा कुटिल डाव - रावसाहेब पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: October 2, 2023 17:56 IST

कंत्राटी नोकरभरतीविरोधात आंदोलन छेडणार

सांगली : शासकीय नोकर भरतीमधील मागासवर्गीय समाजाचे आरक्षण संपविण्याचा कुटिल डाव सरकारने रचला आहे. यातूनच त्यांनी नऊ खासगी कंपन्यांच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात राज्यभर आवाज उठविण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलतांना दिला.पाटील पुढे म्हणाले, शासकीय कार्यालयातील नोकर भरती कंत्राटी पद्धतीने खासगी कंपन्यांकडून करण्यात येणार आहे. या समाजविघातक निर्णयामुळे संविधानातील आरक्षण तरतुदीचा शासनाने भंग केला आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीय, ओबीसी, आर्थिक मागास व एन. टी. प्रवर्गातील उमेदवारांचा आरक्षणाचा हक्क डावलला जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने भरती ही मुळातच राज्य घटनेतील तरतुदींविरुद्ध आहे. त्यामुळे तातडीने हा निर्णय शासनाने रद्द केला पाहिजे. वेतनश्रेणीवर प्रचलित नियमाप्रमाणे शासकीय, निमशासकीय व शिक्षण क्षेत्रातील नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. राज्यात प्रचंड बेरोजगारी आहे. नोकऱ्या नसल्याने तरुण हवालदिल झाला आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. यातच कंत्राटी नोकरभरती म्हणजे तरुणांच्या अस्तित्वावर घाला घालून शासनाने प्रचंड नाराजी ओढवून घेतली आहे. एका बाजूला मराठा, धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला कंत्राटीकरण करून आरक्षणाचा लाभच मिळू नये, अशी खेळी खेळण्याची रणनीती शासनाने बंद केली पाहिजे. आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित होईपर्यंत आरक्षणाची गरज आहे. संविधान, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षण हक्कावर गदा आणणारा कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द झाला नाही तर राज्यभर बेरोजगार तरुणांना घेऊन रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली