शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सरकारची सहकारावर वक्रदृष्टी

By admin | Updated: May 17, 2017 23:21 IST

सरकारची सहकारावर वक्रदृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : राज्यात काँग्रेस सरकारच्या काळात सहकाराचे मोठे जाळे निर्माण झाले. आता भाजप सरकारच्या काळात सहकार चळवळ अडचणीत आली आहे. केंद्र सरकार व पंतप्रधानांचा सहकारी बँकांवर विश्वास नाही. सहकारी संस्थांबाबत सरकारची वक्रदृष्टी आहे. ज्या सहकारी संस्थांमध्ये गैरप्रकार आहेत, त्यांना जरूर बेड्या ठोका, परंतु संपूर्ण सहकार चळवळीस वेठीस धरू नका, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला.चिंचणी (ता. कडेगाव) येथील हनुमान सर्व सेवा सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव, नूतन इमारतीचे उद्घाटन व आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार जयकुमार गोरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, डॉ. जितेश कदम उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, साडेबारा लाख कोटी रुपये उत्पन्न असलेले उत्तर प्रदेशसारखे राज्य एकाच महिन्यात ३६ हजार कोटी रुपये कृषिकर्ज माफीचा निर्णय घेऊ शकते. मग देशात सर्वात प्रगत असणारे आणि साडेअठरा लाख कोटी रुपये उत्पन्न असणारे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांची कर्जमाफी का करू शकत नाही? काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्यावतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात संघर्षयात्रा काढण्यात आली. आता कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार संवेदनाशून्य झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ३० हजार ५०० कोटी रुपयांची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीबाबत टाळाटाळ करीत आहेत. या सरकारच्या विरोधात संघर्ष अटळ आहे. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही.डॉ. पतंगराव कदम म्हणाले, आघाडी शासनाच्या काळात आम्ही मार्गी लावलेल्या विकास कामांचे श्रेय भाजपचे नेते लाटत आहेत. अवैध धंदे जोमात सुरु आहेत. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. दारूबंदीला माझा पाठिंबा आहे. चिंचणी येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला आहे. या परिसराच्या सुशोभिकरणासाठी ट्रस्टमधून सर्व ती मदत करणार आहे.आ. मोहनराव कदम म्हणाले, चिंचणी सोसायटीच्या सचिवपदी मी १९६२ ते १९७२ दरम्यान १० वर्षे काम केले आहे. या गावाने मला खूप प्रेम दिले, त्यामुळे मी या गावातच स्थायिक झालो. विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात सहकारी संस्था सक्षम झाल्या. आर्थिकदृष्टया अडचणीत असलेल्या संस्थांना राज्य आणि केंद्र सरकारने अर्थसहाय्य दिले. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय काँग्रेसनेच घेतला. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब यादव, सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष पी. सी. जाधव, संचालक बापूसाहेब पाटील, निवृत्ती जगदाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सहायक निबंधक अनुराधा पंडितराव, सरपंच कैलास माने, सोसायटीचे अध्यक्ष राजकुमार पाटील, उपाध्यक्ष दौलतगिरी गोसावी, सचिव बाळासाहेब मोरे उपस्थित होते. श्रीरंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.मोहनरावांवेळी राष्ट्रवादीची मदतआमचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने सातारा-सांगली विधान परिषदेचे जागा सोडण्यास नकार दिला. यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा कमी होते, परंतु जिंकण्याच्या निर्धाराने लढलो. मोहनराव आणि पतंगराव कदम यांचे सांगली, सातारा जिल्ह्यात सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीने क्रॉस मतदान करून सहकार्य केले आणि कदम यांनी विजय मिळविला, असेही चव्हाण म्हणाले.विधान परिषद निवडणुकीत माझा सख्खा भाऊ मोहनराव कदम यांच्याविरोधात उभा होता. या निवडणुकीच्या प्रचारात मी सातत्याने विश्वजित कदम यांच्याबरोबर होतो. विश्वजित यांनी मोहनराव कदम यांना आमदार करण्याचा निर्धारच केला होता. त्यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम अविस्मरणीय आहेत, असे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.