शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द :  विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:42 IST

तळमळीने काम करून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द : विश्वजीत कदमविविध विभागांच्या खाते प्रमुखांसमवेत आढावा बैठक

सांगली : शासन महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच, तरूण पिढी, अडचणीत सापडलेला शेतकरी अशा सर्वांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी तळमळीने काम करून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या खाते प्रमुखांसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, लोकांची प्राधान्य क्रमाची गरज ओळखून शासन वाटचाल करीत आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे पाऊल शासनाने उचलले आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात सहकाराला पूर्वीचे जे वैभवाचे, गौरवशाली दिवस आहेत ते अधिक क्षमतेने मजबूत करण्याच्या दृष्टीने राज्य शासन पावले टाकणार आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात काही सकारात्मक निर्णय घेऊ.

महापुरामुळे शेतीचे नुकसान, घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली त्यासाठी मदतही मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे. तसेच रस्ते व पुलांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत सांगली, कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन एक स्वतंत्र वेगळे पॅकेज सांगली, कोल्हापूर साठी कसे देता येईल याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सहकार, कृषी, समाज कल्याण, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पुरवठा विभाग, पाटबंधारे आदि विविध विभागांचा सविस्तर आढावा घेऊन समस्या जाणून घेतल्या.

यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना करून प्रशासनातील रिक्त पदे, प्रशासनास उपलब्ध होणारी साधनसामुग्री याबाबत प्रशासनाची बाजूही शासन दरबारी भक्कपणे मांडली जाईल असे अश्वासीत केले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगली